ETV Bharat / sukhibhava

Health Tips : 'या' आजारांनी त्रस्त असलेल्यांनी खाऊ नये 'मखाना', अन्यथा वाढतील समस्या - Common flu cold or diarrhoea

मखानामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीनसारखे अनेक गुणधर्म आढळतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही तुम्हाला माहीत आहे का, कोणत्या लोकांनी मखाना (Makhana) खाणे टाळावे? जाणून घेऊया मखाना कोणाला फायद्याऐवजी नुकसान करू शकतो.

Health Tips
मखाना
author img

By

Published : Nov 17, 2022, 10:04 AM IST

हैदराबाद: सुका मेवा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे सर्वांना माहीत आहे. विशेषतः, मखाना (Makhana). आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मखानामध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे लोकांना उपवासाच्या वेळीही ते खायला आवडते.

फायद्याऐवजी नुकसान: मखानामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीनसारखे अनेक गुणधर्म आढळतात. आरोग्यासाठी इतके फायदेशीर असूनही तुम्हाला माहीत आहे का, कोणत्या लोकांनी मखाना खाणे टाळावे? जाणून घेऊया मखाना कोणाला फायद्याऐवजी नुकसान करू शकतो.

पोटाशी संबंधित समस्या: (Stomach-related problems) तज्ज्ञांच्या मते मखानामध्ये फायबर आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात, त्यामुळे ते पचायला जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या जसे जठरासंबंधी किंवा फुगवटा होत असेल तर मखानाचे सेवन ताबडतोब बंद करा. मखानाच्या सेवनाने तुमची समस्या आणखी वाढू शकते.

प्रेग्नेंसी: प्रेग्नेंसीमध्ये (Pregnancy) अधिक प्रमाणात मखाना खाऊ नये. मखाणामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.

किडनी स्टोनची तक्रार: तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किडनी स्टोनची तक्रार (Kidney Stone Complaint) असेल तर मखानाचे सेवन फार मर्यादित प्रमाणात किंवा अजिबात करू नका. वास्तविक, मखानामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. याचे अधिक सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि तुमच्या स्टोनचा आकारही वाढू शकतो.

साखरेची पातळी वाढू शकते: मखान्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट असते. जर तुम्ही अधिक प्रमाणात मखान्याचे सेवन केल्यास तुमच्या शरिरातील साखरेची पातळी वाढू (May increase sugar levels) शकते.

सामान्य फ्लू, सर्दी किंवा अतिसाराचा त्रास: जर तुम्हाला सामान्य फ्लू, सर्दी किंवा अतिसाराचा त्रास (Common flu, cold or diarrhoea) होत असेल तर तुम्ही मखानाचे सेवन करू नये. फ्लूमध्ये मखाना खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.

डायरियाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जात नाही: मखानामध्ये असलेले फायबर डायरियाच्या रुग्णांसाठी चांगले मानले जात नाही. वास्तविक, मखानामध्ये असलेल्या फायबरचे एक मुख्य कार्य म्हणजे आतड्याची हालचाल सुधारणे. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या असते तेव्हा त्याला फायबरयुक्त अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्हाला आधीच अतिसाराचा त्रास होत असेल तर मखानाचे सेवन करू नका. यामुळे तुमच्या समस्येत भर पडू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.