ETV Bharat / sukhibhava

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम म्हणजे काय? जाणून घ्या..!

author img

By

Published : Jul 15, 2020, 12:02 PM IST

रात्रीच्या वेळी पाय हलविण्याची तीव्र इच्छा असणे किंवा सतत अस्वस्थता जाणवणे ही रेस्टलेस लेग्स सिंड्रोमची (आरएलएस) लक्षणे आहेत. न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, “रेस्टलेस लेग्स सिंड्रोम (आरएलएस), ज्याला विलिस इकबॉम सिंड्रोम देखील म्हणतात, हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामुळे अवयवांमधील संवेदना वहनांमध्ये बिघाड होऊन अंग हलविण्याची तीव्र इच्छा निर्माण होते.

restless-legs-syndrome
रेस्टलेस लेग्स सिंड्रोम म्हणजे काय?

मुंबई - धावपळीच्या युगात माणसाचे आरोग्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष होते. काही आजार नव्यानेच जाणवू लागतात. त्याच्याबद्दल प्रत्येकाला पुरेशी माहिती असतेच असे नाही. अशाच प्रकारे रेस्टलेस सिंड्रोम हा देखील एक आजार आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात या विशेष लेखातून..

या आजाराची सर्वसामान्य लक्षणे म्हणजे एखाद्याला त्याचा पाय ओढल्यासारखा वाटणे, पायात चमक येणे किंवा सतत अस्वस्थता जाणवणे. याविषयीची अधिक माहिती देताना हैदराबादच्या व्हीआयएनएन हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजीशियन एमडी (जनरल मेडिसिन) डॉ. राजेश वूकला म्हणतात, ऑक्सिजन आणि उर्जा पुरवठ्यात घट झाल्यामुळे मज्जातंतूंचे कार्य बिघडून हा त्रास जाणवण्यास सुरुवात होते. तसेच, आपण मज्जातंतू संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास हे लक्षात येते की रात्रीच्या वेळी हा त्रास तीव्र होतो. ज्या लोकांना डायबिटीस, हायपोथायरॉईडीझम, अॅनेमिया, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी ची कमतरता आहे, त्यांच्यामध्ये हा त्रास दिसून येतो. त्यामुळे या त्रासांना नियंत्रणात ठेवून रेस्टलेस लेग्स सिंड्रोमवर मात केली जाऊ शकते.

काय केले जाऊ शकते?

सौम्य ते तीव्र स्वरूपात आरएलएसची लक्षणे असू शकतात. तथापि, लवकर निदान आणि योग्य उपचार घेतल्यास त्यावर मात केली जाऊ शकते. डॉ. राजेश स्पष्ट करतात, की अशी काही औषधे उपलब्ध आहेत. ज्यामुळे मज्जातंतूंचा त्रास कमी होतो. आपल्या देशात काही केमिकल्स आणि गोळ्यांच्या साह्याने पेशींमध्ये ऑक्सिजन पुरवठा वाढवून उपचार केले जातात. तरीही, कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेव्हा अशा काही लक्षणांचा अनुभव येतो, तेव्हा इतरही काही गोष्टी केल्या जाऊ शकतात, त्यामध्ये...

  • आपल्या हातांनी त्या भागाची मालिश करा
  • स्नायू शिथील करणे
  • कोल्ड पॅक वापरणे

अर्थातच प्रत्येक वेळी आणि प्रत्येकालाच हे उपाय लागू होतील असे नाही. कारण प्रत्येकाची शाररिक स्थिती वेगळी असू शकते.

याचे आणखी काय परिणाम असू शकतात?

या व्यतिरिक्त, याचा सर्वात मोठा परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होऊन पुढील गुंतागुंत वाढते, किंवा दररोजच्या नित्यक्रमांमध्ये अडथळा निर्माण होतो. झोपेच्या अभावी आपल्या आरोग्यावर बरेच परिणाम होतात. पुरेशा झोपेचे महत्त्व विशद करताना डॉ. राजेश सांगतात ,

● आपल्या दैनंदिन कामांमध्ये पुरेशी झोप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

● झोपेमुळे आपल्या शरीरातील बरेच हार्मोन्स नियंत्रित होतात.

● अपुऱ्या झोपेमुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाचे अनियमित धडधडणे हे आजार होऊ शकतात.

● यामुळे मेंदूला पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजनच्या कार्यात अडथळा येऊन पुढील काही दिवस तुमची एकाग्रता पातळी आणि योग्यतेबरोबर / ऍप्टिट्यूड बरोबर तडजोड केली जाऊ शकते.

अस्वस्थता, झोपेवर परिणाम होऊन आणि दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या आजारावर मात करण्यासाठी उपचारांना प्राधान्य देणे महत्वाचे आहे. यासाठी काही घरगुती उपचार केले जाऊ शकतात. परंतु, त्रासाचे प्रमाण जास्त असेल किंवा त्यात वारंवारता असेल तर डॉक्टरांशी सल्लामसलत करून वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.