नवी दिल्ली : उन्हाळा आल्यानंतर मोठ्या प्रमाणात उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उकाड्यापासून सुटका करण्यासाठी काही खास पेय बनवण्याची कृती आम्ही तुम्हाला या लेखातून स्पष्ट करणार आहोत. या खास पेयांसह तुम्ही आपले शरीर पुन्हा हायड्रेट करून उकाड्यापासून सुटका करू शकता. तेव्हा या खास ट्रीक्स वापरुन तुम्ही ही खास पेय बनवून उकाड्यापासून सुटका मिळवा.
आंब्याचे पन्ह : कच्च्या आंब्यापासून पन्ह हे तुम्हाला उकाड्यापासून नक्की सुटका करणारे दर्जेदार पेय आहे. त्यासाठी तुम्हाला जिरे आणि पुदिन्याच्या पानांचा उपयोग करुन बनलेले एक थंड उन्हाळी पेय आहे. आंब्याचे पन्ह हे एक लोकप्रिय भारतीय पेय आहे. ते उत्साहवर्धक आणि ताजेतवाने दोन्ही आहे. हे वाढत्या उष्णतेचा प्रतिकार करण्यास मदत करुन त्वरीत आपल्याला हायड्रेट करते.
साहित्य : हिरवे आंबे ५०० ग्रॅम, साखर १/२ कप, मीठ २ चमचे, काळे मीठ २ चमचे, भाजलेले जिरे २ चमचे, बारीक चिरलेली पुदिन्याची पाने २ चमचे, पाणी २ वाट्या.
कृती : आंबे आतून मऊ होईपर्यंत उकळून घ्या. पुरेसे थंड झाल्यावर त्याची साल काढून टाका. त्यानंतर त्याला पिळून घ्या. सर्व साहित्य एकत्र करुन मिक्स करा. त्यानंतर त्यात 2 कप पाणी घाला. ग्लासमध्ये थोडा बर्फ ठेवा आणि त्यामध्ये आंब्याचे पन्ह टाका. अशा प्रकारे तुमचे आंब्याचे पन्ह तयार आहे.
बर्फ जलजीरा : अतिशय चांगली चव असलेले उत्साहवर्धक पेय आहे. तुम्हाला झटपट उत्साह देण्यासाठी बर्फ जलजीरा हे एक अतिशय चांगले पेय आहे.
काय लागते साहित्य : चिंच 125 ग्रॅम, पुदिन्याची पाने 3 टीस्पून, जीरे 1/2 टीस्पून, भाजलेले जीरे 3/4 टीस्पून, किसलेला गूळ 50 ग्रॅम, काळे मीठ 4 टीस्पून, काळे मीठ, लिंबाचा रस ३-४ चमचे, चिमूटभर मिरची पावडर (काश्मिरी मिर्च), गरम मसाला १/२ टीस्पून, पाणी १/२ लीटर.
कृती : जलजिऱ्यासाठी सर्व साहित्य फूड प्रोसेसरमध्ये घालून एकत्र करा. रात्रभर थंड करुन नंतर गाळून थंड करा. तुमचे बर्फाचे जलजीरा तयार आहे.
सत्तू शरबत : बिहारमधील सत्तू शरबत हा उन्हाळ्यातील स्वादिष्ट पदार्थ, त्याच्या थंड गुणांसाठी प्रसिद्ध आहे. पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये त्याची चांगलीच ख्याती आहे. त्यासह सत्तू शरबत देशभरात लोकप्रिय आहे.
साहित्य : चना सत्तू - ४ वाट्या, थंडगार पाणी - ४ वाट्या, लिंबाचा रस - २ चमचे, भाजलेले जीरे - अर्धा टीस्पून, पुदिन्याची पाने - २ चमचे, काळे मीठ चवीनुसार, हिरवी मिरची - १, कच्चा आंबा - 2 चमचे
कृती : एका भांड्यात सर्व साहित्य घालून चांगले मिसळा. काही बर्फाच्या तुकड्यांसोबत ग्लासमध्ये सर्व्ह करा. त्याला पुदिन्याच्या पानांनी सजवू शकता. अशाप्रकारे तुमचे सत्तू शरबत तयार आहे.
आंबा लस्सी : लस्सी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात उकाड्यापासून सुटका करण्यासाठी लस्सीला सगळेजण पसंती देतात. मात्र आंबा लस्सी नेहमीच्या लस्सीपेक्षाही चांगली असून तुम्ही एकदा ट्राय करायला नक्की हरकत नाही.
साहित्य : दही 125 मिली, बर्फाचे पाणी 200 मिली, बर्फ 8 चौकोनी तुकडे, आंबा चिरलेला 1, साखर 1 स्पून, चिमूटभर सुका पुदिना.
कृती : सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये एकत्र करून घ्या. थंडगार सर्व्ह करा. अशाप्रकारे तुमची आंबा लस्सी तयार आहे.
हेही वाचा - Refreshing Watermelon Drinks : आला उन्हाळा तब्येत सांभाळा, उकाड्यापासून सुटकेसाठी असे बनवा टरबूज पेय