ETV Bharat / sukhibhava

लहान मुलांसाठी पोषक आहार गरजेचा

लहान किंवा पौगंडावस्थेतील मुलांच्या चांगल्या बुद्धीमत्तेसाठी सर्वसमावेशक आहार असणे गरजेचे असते. ईटीव्ही भारतने महाराष्ट्रातील नाशिक येथील जगदीश बाल मार्गदर्शन आणि दुग्धपान व्यवस्थापन क्लिनिकच्या डॉ. शमा जगदीश कुलकर्णी, (एमबीबीएस, डीसीएच, आयबीसीएलसी) या पौगंडावस्थेतील मुलांच्या आरोग्यविषयक तज्ञांशी याविषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासंबंधी चर्चा केली.

nutritious diet
पोषक आहार
author img

By

Published : Feb 4, 2021, 8:15 AM IST

हैदराबाद - पालक नेहमीच बालरोग विशेषज्ञांकडे जाऊन आपल्या मुलांसाठी महागातील महाग टॉनिक्सची देण्याची मागणी करत असतात. माझे मूल सर्व स्पर्धेत पहिले आले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे असते. जेव्हा केव्हा स्पेलिंग, पोहणे, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा किंवा जिल्हा किंवा राष्ट्रीय स्तरावरील इतर कोणतीही शुद्ध शैक्षणिक परिक्षा असते, तेव्हा आपल्या बाळाचा मेंदू बळकट बनवणाऱ्या टॉनिकचा शोध घेण्यास पालक सुरूवात करतात.

स्मरणशक्ति वाढवणाऱ्या टॉनिक किंवा मल्टिव्हिटॅमिनवर पालक कितीही पैसे खर्च करण्यास तयार असतात. पण डॉ. शमा यांच्या मते, कोणत्याही टॉनिकपेक्षाही पोषक आहार हाच अधिक महत्वाचा आहे. मुलांच्या पहिल्या दिवसापासून ते एक हजाराव्या दिवसापर्यंत मेंदूतील मज्जातंतूंचे जाळे तयार होत असते. म्हणजे, मज्जातंतू आणि त्यांची जोडणी विकसित होत असते, त्याचवेळी मेंदूही वाढत असतो. प्रसुतीदरम्यान, म्हणजे २८० दिवसात, आईचा आहार अत्यंत महत्वाचा आहे. पहिले सहा महिने बाळाला केवळ स्तनपान दिले गेले पाहिजे. इतर कोणत्याही द्रव्याचा एक थेंबही देता कामा नये. सहा महिन्यांनंतर, घरी तयार केलेले मऊ पूरक आणि ताजे शिजवलेले अन्न दिले गेले पाहिजे. जी मुले आईच्या दुधावर वाढली आहेत, त्यांचा बुद्धिमत्ता निर्देशांक(आय क्यू) जास्त असतो.

त्यामुळे, या एक हजार दिवसात तुम्ही जितके तुमच्या मुलाकडे लक्ष द्याल, तितकी त्याची बुद्धिमत्ता उच्च दर्जाची बनते. या दिवसांमध्ये तुम्ही जर मुलाला प्रेम शिकवले तर ती प्रेमळ स्वभावाची होतात आणि तुम्ही जर त्यांना द्वेष शिकवला तर ती द्वेष करायला शिकतात. आणि तुम्ही त्यांना काहीच शिकवले नाही तर, ती केवळ मांसाचा गोळा म्हणून वयाने वाढतात. त्यामुळे या दिवसांत तुम्ही त्यांना काय शिकवता, काय आहार देता, ते अत्यंत महत्वाचे असते. तुम्ही त्यांच्याशी कसे वर्तन करता, तुम्ही त्यांच्यात कोणती तत्व भरता, कोणत्या सवयी तुम्ही त्यांना लावता, हेही अत्यंत महत्वपूर्ण आहे.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी अन्न हे महत्वाचे आहे. प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे यांचा मिळून चांगल्या पोषक आहाराचा स्त्रोत बनतो. भाज्या, मोड आलेले पदार्थ, डाळी, आणि धान्य यांचा आहार बाळाच्या शारिरिक आणि मानसिक विकासाला मदत करतो. बाळ त्याला दिलेल्या सर्व पदार्थांची चव घेत असते आणि त्यातून त्याची चव विकसित होण्यास मदत होते. चविष्ट आणि रंगीत खाद्यपदार्थाचे सेवन लहान बाळ आवर्जून करते. पोषक मूल्यांचा समावेश असलेल्या विशेषतः घरी शिजवलेल्या आणि ताज्या अन्नपदार्थांवर मातांनी भर द्यायला हवा, जे घनस्वरूपातील असेल. हळदीसारखे भारतीय अन्नपदार्थ जखमा बऱ्या करतातच परंतु रोग प्रतिकारशक्तिही वाढवतात. नाचणी किंवा बाजरीसारखे धान्य कॅल्शियम देतात तर मोड आलेली कडधान्ये आणि डाळी प्रथिने देतात. फळांमधून सी जीवनसत्वांसारखी वेगवेगळी जीवनसत्वे पुरवली जातात.

नैसर्गिक अन्नपदार्थांच्या तुलनेत डबाबंद खाद्यपदार्थ मुलांना जास्त प्रथिने देतात, हा लोकांचा गैरसमज आहे. डाळीचे पाणी, भाताची पेज, चिप्स, बिस्किट, टिनच्या डब्यातील पदार्थांऐवजी, इडली, उपमा, पोहे, शिरा, कडधान्याचा डोसा, भाज्यांची खिचडी असे पदार्थ बाळाला दिले पाहिजेत. बाळाला अन्न देताना सर्व पाचही जाणिवांचा विचार केला पाहिजे, अन्नाची घडण, रंग, मळून घेतलेले अन्न याची जाणिव बाळाला करून घेऊ द्यावी. त्यामुळे बाळाच्या मनात कुटुंबाबद्दल आपलेपणाची भावना तयार होते.

मेंदूचा विकास होण्यासाठी पुढील इनपुट्स अत्यंत महत्वाचे आहेत -

• डीएचए(डेकोसाहेक्झॉनॉईक असिड) जर्दाळू, माशांमध्ये सापडते
• गूळ, खजूर, लोखंडी भांड्यात शिजवलेल्या अन्नात लोह सापडते
• मेंदूपर्यंत पोहचणाऱ्या नैसर्गिक अन्नामुळे डीएनएला मदत होते.
• टिनच्या डब्यातील बंद किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये कोणतेही पोषक
मूल्य नसते आणि ते मेंदूला चालनाही देत नाहि.
• कडधान्ये, पॉलिश न केलेल्या डाळी यांचा संयोग मेंदू विकसित करण्यात मदत
करतो.
• बाळाचा मेंदू एक हजार दिवसात आयक्यू विकसित होण्यास मदत करतो.
• मेंदू सुदृढ होण्यासाठी पोषक आहार मदत करतो.
• विधायक खेळांसाठी पोषक आहाराची मदत होते.
अधिक माहितीसाठी संपर्क kulkarnishamaj@gmail.com

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.