जिनेव्हा, स्वित्झर्लंड: करंट बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रुग्णांच्या अभ्यासात स्वित्झर्लंडमधील संशोधकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी शोधून काढले आहे की,झोपेच्या वेळी वायरलेस हेडबँडद्वारे दिवसाच्या सकारात्मक अनुभवाशी संबंधित आवाज वाजवल्याने आपल्याला येणारी भयानक स्वप्ने (Nightmares) कमी होऊ शकतात. (manipulating emotions). स्वप्न पाहणाऱ्यांना त्यांच्या वारंवार येणाऱ्या दुःस्वप्नांच्या सकारात्मक आवृत्त्यांचा अभ्यास करण्यासाठी थेरपीमध्ये प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात? : जिनिव्हा युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स आणि जिनिव्हा युनिव्हर्सिटीच्या स्लीप लॅबोरेटरीचे मानसोपचारतज्ज्ञ, ज्येष्ठ लेखक लॅम्प्रोस पेरोगामव्रॉस म्हणतात की, स्वप्नांमध्ये अनुभवल्या जाणार्या भावनांचे प्रकार आणि आपला भावनिक विकास यांच्यात एक संबंध आहे. या निरीक्षणाच्या आधारे आम्हाला कल्पना होती की आम्ही लोकांना त्यांच्या स्वप्नातील भावना हाताळून मदत करू शकतो. या अभ्यासाद्वारे आम्ही दाखवले की आम्ही दुःस्वप्नांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये भावनिकदृष्ट्या खूप मजबूत आणि अतिशय नकारात्मक अशा स्वप्नांची संख्या कमी करू शकतो.
एपिडेमियोलॉजिकल अभ्यासात काय आढळून आले? : एपिडेमियोलॉजिकल अभ्यासात असे आढळून आले आहे की, 4 टक्क्यांपर्यंत प्रौढांना कोणत्याही वेळी दीर्घकाळ भयानक स्वप्ने पडतात. ही स्थिती रात्रीच्या वेळी अचानक जाग येणे आणि शांत झोप न लागणे यांच्याशी संबंधित आहे. रुग्णांना वारंवार इमेजरी रिहर्सल थेरपी लिहून दिली जाते. याद्वारे त्यांना स्वप्नातील नकारात्मक परिस्थिती पुन्हा लिहावी लागते आणि दिवसभरात रिहर्सल करणे आवश्यक असते. पेरोगामव्रॉस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा 36 रूग्णांची तपासणी केली जे सर्व इमेजरी रिहर्सल थेरपी घेत होते. गटातील अर्ध्या लोकांना त्यांच्या दुःस्वप्नाची सकारात्मक आवृत्ती आणि कल्पनाशक्ती यांच्यात एक संबंध निर्माण करणे आवश्यक होते. त्यांना दोन आठवडे झोपेच्या वेळी आवाज पाठवू शकेल असा हेडबँड घालणे आवश्यक होते. हीच अशी झोपेची अवस्था आहे जिथे बहुतेक भयानक स्वप्ने येतात.
सहभागींच्या दुःस्वप्नांमध्ये झपाट्याने घट: पेरोगामव्रॉस म्हणतात, सहभागींनी अभ्यास प्रक्रियेला अत्यंत चांगला प्रतिसाद दिला, याचे आम्हाला आश्चर्य वाटले, यात दररोज इमेजरी रिहर्सल थेरपी करणे आणि रात्री झोपताना हेडबँड घालणे हे सुद्धा आले. पेरोगामव्रॉस म्हणतात, आम्ही सहभागींच्या दुःस्वप्नांमध्ये झपाट्याने घट झाल्याचे पाहिले. तसेच त्यांची स्वप्ने भावनिकदृष्ट्या अधिक सकारात्मक होत होती. आमच्या सारख्या संशोधकांसाठी आणि चिकित्सकांसाठी हे निष्कर्ष झोपेदरम्यानच्या भावनिक प्रक्रियेच्या अभ्यासासाठी आणि नवीन उपचारांच्या विकासासाठी खूप आशादायक आहेत.
थेरपीची अधिकाधिक चाचणी केली जावी: दोन्ही गटांमध्ये दर आठवड्याला भयानक स्वप्ने कमी होत असल्याचे दिसून आले, परंतु संयोजन थेरपी घेतलेल्या अर्ध्या लोकांना तीन महिन्यांनंतर कमी भयानक स्वप्ने आली. त्यांच्या स्वप्नात अधिक आशावाद होता. या प्रयोगावरून असे लक्षात आले की, अशा एकत्रित थेरपीची मोठ्या प्रमाणावर आणि विविध लोकसंख्येवर अधिकाधिक चाचणी केली जावी जेणेकरून त्याची प्रभावीता किती प्रमाणात आहे हे स्पष्ट होईल.