ETV Bharat / sukhibhava

पर्यावरण संरक्षणासाठीही होऊ शकतो राखीचा उपयोग, वाचा... - पर्यावरण संरक्षण राखी महत्व

वर्तमान काळात लोकं मोठ्या संख्येने इको फ्रेंडली पद्धतीने सण साजरा करण्याला प्राथमिकता देत आहेत. याचेच अनुसरण करून यंदा देखील इको फ्रेंडली राखी तयार केली जात आहे, ज्यातून वनस्पती देखील उगवली जाऊ शकते.

environmental protection rakhi etv bharat
पर्यावरण संरक्षण आणि राखी
author img

By

Published : Aug 23, 2021, 5:08 PM IST

वर्तमान काळात युवा पीढी पर्यावरण संरक्षणाबाबत जास्त जागरूक होत आहे. ज्याचे परिणाम असे की, ते केवळ पार्यावरण संरक्षणासाठी संवेदनशील प्रयत्न करत नसून अशा लोकांना देखील समर्थन देत आहेत जे या दिशेने कार्य करत आहेत. याचे सकारात्मक परिणाम असे की, वर्तमान काळात लोकं मोठ्या संख्येने इको फ्रेंडली पद्धतीने सण साजरा करण्याला प्राथमिकता देत आहेत. याचेच अनुसरण करून यंदा देखील इको फ्रेंडली राखी तयार केली जात आहे, ज्यातून वनस्पती देखील उगवली जाऊ शकते.

आजकाल सण केवळ धार्मिक मान्यतांनुसारच साजरा केले जात नाही, तर त्यांना फॅशन, खाद्यपदार्थ आणि उत्सवांच्या ट्रेंडच्या रुपात देखील प्रसिद्धी मिळत आहे, ज्याचे परिणाम त्यांना साजरा करण्याच्या पद्धतीवरही दिसून येतात. त्याचबरोबर, सणांना पर्यावरणपुरक पद्धतीने साजरा करणे हा सध्याचा ट्रेंडच नव्हे तर ती एक गरजही बनत आहे. अशात बाजारात बेकार, प्रामाणिक आणि पर्यावरणपूरक उत्पादनांसोबत प्रयोग करून तयार करण्यात आलेली उत्पादने सहसा घेतली जातात, जसे इको फ्रेंडली गणेश आणि होळीत सेंद्रिय रंग.

याच पार्श्वभूमीवर वडोदरा येथील 'साजके' ब्रँड इको फ्रेंडली राखींची निर्मिती करत आहे, ज्यांच्या निर्मितीत न केवळ हळद, केसर आणि चंदन सारख्या प्राकृतिक घटकांचा वापर केला जात आहे, तर वनस्पतींच्या बियाण्यांना देखील वापरात आणले जात आहे.

परंपरा आणि प्रयोग

वडोदरा येथील 'साजके' हे गट या रक्षाबंधनात न केवळ 'वैदिक' पर्यावरणपूरक राखींचे निर्माण करत आहे ज्यात हळद, चंदन आणि केसरचे घटक आहेत, तर त्याने या सणासाठी विशेष राखी किट देखील बाजारात आणली आहे. या किटमध्ये एक राखी आहे जी वापरल्यानंतर तिचा एका बियाण्याच्या रुपात वापर केला जाऊ शकतो, जे पालक वनस्पती वाढवण्यास मदत करते. यात एक बायोडिग्रेडेबल पॉट, पालकचे बियाणे, मातीसाठी कॉयर आणि एक सेंद्रिय खत आहे.

उल्लेखनीय म्हणजे, 'साजके' गट शून्य कचरा उत्पादनांसोबत हस्तनिर्मित आणि समकालीन कपडे तयार करतो ज्यात मोहरीच्या बियाण्यांचा वापर होतो. आईएएनएसलाइफ ला देण्यात आलेल्या एका सूचनेत 'साजके'च्या मालक आणि संस्थापक दिव्या आडवाणी सांगतात की, आजचा ग्राहक जागरुक आहे आणि बदलाचा एक भाग बनू इच्छित आहे, त्याचबरोबर त्याला कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी योगदान द्यायचे आहे. त्याचे हेच विचार त्याच्या भेटवस्तू देण्याच्या निवडीलाही प्रभावित करत आहे. यासह या प्रकारचा कल आपल्या संस्कृतीशी देखील जुळलेला आहे, त्यामुळे जेव्हा लोकं या वस्तूंना निवडतात तेव्हा त्यांना त्यांच्या मुळाशी देखील जुळले असल्याचे वाटते.

यासंदर्भात 'ईटीव्ही भारत सुखीभव'च्या पथकाने महाराष्ट्राच्या नागपूर येथील श्री. श्रद्धानंद अनाथाश्रमाच्या सयुक्त सचिव गीतांजली बुटी यांच्याशी बातचित केली. त्यांनी सांगितले की, अनाथाश्रमातील मुलांनी देखील बियाण्यांपासून राखी बनवली आहे, ज्यांना ते बाजारात योग्य दरात विकत आहेत. त्या म्हणाल्या की, साथीच्या काळात आम्हाला अशी जाणीव झाली की, देशासाठी काही करायला हवे आणि त्यामुळे आम्ही अशी उत्पादने बनवत आहोत ज्यामुळे आपल्याला राहण्यासाठी चांगले वातावरण मिळेल.

रक्षाबंधन हे बहीण-भावातील प्रेमाचा सण आहे आणि राखी बांधल्याने त्यांचे प्रमे सुरक्षित होईल, परंतु यामाध्यमातून आपण जर एखादे बी पेरले तर आपण धरती मातेप्रति आपल्या कर्तव्यांना देखील पूर्ण करतो. आमच्या राखींमध्ये आम्ही फळे, भाज्यांचे बियाणे टाकले आहेत ज्यांना सहजरित्या घरातील कुंड्यांमध्ये उगवले जाऊ शकते, अशी माहिती गीतांजली बुटी यांनी दिली.

गीतांजली पुढे म्हणाल्या की, वर्तमान काळात अनेक मुले साथीशी संबंधित प्रतिबंध आणि भीतीमुळे शाळेत जाण्यास असमर्थ आहे, म्हणून अशा उपक्रमांद्वारे अनाथाश्रमातील मुलांना न केवळ मोकळा वेळ योग्यरित्या खर्च करण्यात मदत मिळते, तर त्यांच्या वैयक्तिक कौशल्यामध्ये देखील वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जाते, जे भविष्यात त्यांना उपयुक्त ठरते.

या हस्तनिर्मित राखींना विकून आम्हाला जे पैसे मिळतात ते आम्ही आमच्या मुलांच्या विशेषत: मोठ्या मुलींच्या बँक खात्यांमध्ये जमा करतो, जेणेकरून त्या जेव्हा करिअर बनवण्यासाठी आमच्या अनाथाश्रमातून बाहेर पडतील तेव्हा त्या आपल्या जीवनात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हाव्या, असे गीतांजली यांनी सांगितले.

हेही वाचा - बहिणींकडून 'इव्हल आई' आणि 'रुद्राक्ष' राखींना अधिक पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.