ETV Bharat / sukhibhava

मानवी तस्करी एक कलंक! जाणून घ्या, राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिनाचं महत्त्व - Awareness Day 2024

National Human Trafficking Awareness Day : मानवी तस्करीच्या समस्येबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी 11 जानेवारी रोजी 'जागतिक मानवी तस्करी जागरूकता दिन' साजरा केला जातो. मानवी तस्करी पीडितांच्या दुर्दशेबद्दल जागरुकता निर्माण करणं, तसेच त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देणं आणि त्यांचे संरक्षण करणं हा या दिवसाचा उद्देश आहे.

National Human Trafficking Awareness Day 2024
मानवी तस्करी एक कलंक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 10:39 AM IST

हैदराबाद : दरवर्षी 11 जानेवारी हा राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मानवी तस्करीबद्दल जनजागृती करण्यासाठी महत्त्वाचा आहे.

या दिवसाचा इतिहास : 2007 मध्ये युनायटेड स्टेट्स सिनेटने 11 जानेवारी हा राष्ट्रीय मानवी तस्करी जागरूकता दिवस म्हणून स्थापित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. 2010 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी संपूर्ण जानेवारी महिना मानवी तस्करीबद्दल जागरूकता आणि प्रतिबंध करण्यासाठी समर्पित केला. मानवी तस्करी हा आधुनिक गुलामगिरीचा प्रकार मानला जातो. भारतात 2013 मध्ये अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा 1956 मध्ये सुधारणा करून तस्करीचे कलम 370 आयपीसीच्या कलमांमध्ये जोडले गेले. या बेकायदेशीर कृतीमध्ये श्रम किंवा लैंगिक संभोगासाठी बळाचा वापर, फसवणूक किंवा जबरदस्ती यांचा समावेश आहे. तस्कर त्यांच्या पिडीतांना तस्करीमध्ये आकर्षित करण्यासाठी हिंसा, हाताळणी किंवा खोट्या आश्वासनांचा वापर करतात. या दिवसाचा उद्देश लैंगिक तस्करीच्या गुन्ह्याबद्दल अधिक जागरूकता आणणे हा आहे. दरवर्षी, सामाजिक संस्था आणि सरकारच्या पातळीवर, जागरूकता वाढविण्यासाठी जगभरात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मानवी तस्करीविरोधात जनजागृतीची गरज

मानवी तस्करीची कारणे कोणती ? एखाद्या व्यक्तीला ओलिस ठेवणे किंवा बळाचा वापर करून त्याची विक्री करणे, धमकावणे, फसवणूक करणे, हिंसा करणे इत्यादी मानवी तस्करी अंतर्गत येतात. मानवी तस्करीच्या बहुतांश घटनांमध्ये लहान मुले किंवा मुलींचा समावेश असतो. बालमजुरीसाठी इतर राज्यातून लहान मुलांना बेकायदेशीरपणे आणले जाते. मुलांना भीक मागायला लावण्यासाठी आणि हॉटेल, घरे, ढाबे आणि दुकानात काम करायला लावण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करीही केली जाते. वेश्याव्यवसायासाठी मुलींची तस्करी केली जाते. ड्रग्ज आणि शस्त्रांनंतर मानवी तस्करी हा जगातील सर्वात मोठा संघटित गुन्हा आहे. देशात मानवी तस्करीची अनेक प्रमुख कारणे आहेत. दारिद्र्य, निरक्षरता, बंधपत्रित कामगार, वेश्याव्यवसाय, सामाजिक असमानता, प्रादेशिक लैंगिक असमतोल, बाल अश्लीलता ही मुख्य कारणे आहेत. 2016 पासून मानवी तस्करीच्या आकडेवारीत घट झाली आहे.

भारतात तस्करी : मानवी तस्करी ही भारतातील मोठी समस्या आहे. मानवी तस्करीच्या बाबतीत भारत जगातील अव्वल देशांमध्ये आहे. भारतातून पश्चिम आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये मानवी तस्करी होते. जर आपण आकडेवारीबद्दल बोललो तर, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, 2021 मध्ये भारतात मानवी तस्करीची 2189 प्रकरणे नोंदवण्या आली आहेत. हे प्रमाण 2020 पेक्षा जास्त आहे. 2020 मध्ये देशात मानवी तस्करीची 1714 प्रकरणे नोंदवली गेली.

  1. हेही वाचा :
  2. प्रवासी भारतीय दिन 2024 : जगभरात अनिवासी भारतीयांचा 'डंका', जाणून घ्या प्रवासी भारतीय दिनाचा इतिहास
  3. 'जागतिक हिंदी दिवस' 2024; हिंदी भारतातच नाही तर परदेशातही आहे लोकप्रिय
  4. पौष अमावस्येपासून पितरांना मिळते मोक्ष; काय आहे आख्यायिका ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.