हैदराबाद : कोलंबिया यानाने भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला यांनी अंतराळात झेप घेतली होती. नासाने केलेली ही अंतराळ मोहीम फत्ते करुन कल्पना चावला यांच्यासह सात अंतराळवीर परत येत होते. मात्र या कोलंबिया यानाचा अपघात झाल्याने सारे होत्याचे नव्हते झाले. यावेळी कल्पना चावला यांच्यासह अंतराळवीर परत येत असलेल्या कोलंबिया या यानाची चांगलीच चर्चा सुरू होती. नेमके कसे होते, कोलंबिया अंतराळयान, कधी झाली होती कोलंबियाची निर्मिती, कधी केले होते कोलंबिया यानाने आपले पहिले उड्डाण याबाबतची माहिती जाणून घेऊ या खास लेखातून.
काय आहे कोलंबिया यानाचा इतिहास : कोलंबिया यानाची बांधणी 1975 मध्ये नासाकडून करण्यात आली होती. उष्णतेचे नियमन करण्यासाठी कार्बन आवरण लावण्यात आलेले कोलंबिया हे एकमेव यान होते. हे आवरण यानाच्या पंखावर बसवण्यात आले होते. त्यानंतर या यानाच्या शेपटीतही 1992 मध्ये बदल करुन ते ड्रॅग शूट प्रकारचे करण्यात आले होते. कोलंबिया यानाने तब्बल 28 मोहिमा केल्या होत्या. कोलंबिया यानाची पहिली मोहीम 12 एप्रिल 1981 ला करण्यात आली होती. त्यानंतर 28 मोहिमा करणाऱ्या या यानाला कोणतीही अडचण आली नाही. मात्र 1 फेब्रुवारी 2013 ला मोहिमेवरुन परतताना या यानाचा अपघात झाला. या यानात असलेल्या 7 अंतराळवीरांचा या अपघातात मृत्यू झाला. यात भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला यांचाही समावेश होता.
कशी होती यानाची रचना : कोलंबिया यानात आधुनिक यंत्रणा बसवण्यात आलेली होती. त्यात बसण्याचे सीट वेळ पडल्यास बाहेर काढता येण्याजोगे होते. कोलंबिया यानाचे वजन 3600 किलो असल्याचे नासाच्या वतीने देण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या यानात उष्णतेचा त्रास होऊ नये, यासाठी कार्बनचे आवरण बसवण्यात आले होते. त्यामुळे यानात अंतराळवीर सुरक्षित असल्याची खात्री होती. या यानाच्या पंखावर अमेरिकेचे यूएस असे लिहिलेले होते. मात्र नंतर त्यात बदल करुन ते काढण्यात आले होते.
कसा झाला कोलंबियाचा अपघात : कोलंबिया यानाने 16 जानेवारीला 2003 ला अंतराळात झेप घेतली होती. या मोहिमेवर भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या नेतृत्वात 7 अंतराळवीर गेले होते. या अंतराळवीरांनी आपली मोहीम फत्तेही केली होती. मात्र परत येताना कोलंबिया यानाला 1 फेब्रुवारीला अपघात झाला. या अपघातात यानातील सातही अंतराळवीरांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोलंबिया यानाचे हेच शेवटचे उड्डाण ठरले.
हेही वाचा - Cold Water Make You Sick : सावधान, खूप थंड पाणी पिल्याने तुम्ही पडू शकता आजारी, उन्हाळ्यात 'अशी' घ्या काळजी