ETV Bharat / sukhibhava

इम्प्लांटेशन ब्लीडिंग की पीरियड, कसे ओळखावे? वाचा... - Implantation bleeding and Menstrual cycle

इम्प्लांटेशन ब्लीडिंग आणि पीरियड याबाबत गोंधळून जाऊ नये. या दोघांना कसे ओळखावे याबाबत 'ईटीव्ही भारत सुखीभवने' तज्ज्ञ डॉ. मंजुला अनागनी यांच्याशी चर्चा केली. डॉ. मंजुला या हैदराबाद येथील केअर रुग्णालयातील प्रसुतिशास्त्र, लॅपरोस्कोपी सर्जरी विभागातील क्लिनिकल डायरेक्टर आणि एचओडी आहेत. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. डॉ. मंजुला यांनी इम्प्लांटेशन ब्लीडिंग आणि पीरियडबाबत माहिती दिली, तसेच काही प्रश्नांची देखील उत्तरे दिली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 6, 2021, 7:02 PM IST

तुम्हाला पालक व्हायचे आहे, आणि तुम्हाला रक्तस्त्राव (ब्लीडिंग) किंवा स्पॉटिंग (हलका रक्तस्त्राव) दिसून आला, तर घाबरून जाऊ नये, ही तुमच्यासाठी चांगल्या बातमीची चिन्हे असू शकतात. रक्तस्त्राव हे गर्भधारणेचे (pregnancy) सामान्य लक्षण आहे. बऱ्याच गर्भवती महिलांना इम्प्लांटेशन ब्लीडिंगचा अनुभव होतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे इम्प्लांटेशन ब्लीडिंगच आहे, हे कसे कळेल? इम्प्लांटेशनवेळी तुमचे किती रक्तस्त्राव होते? आणि त्याची प्रथम लक्षणे कोणती? हे ब्लीडिंग (रक्तस्त्राव) कसे दिसते? त्यावर डॉ. मंजुला स्पष्टीकरण देतात की, इम्प्लांटेशन ब्लीडिंग हे सामान्यत: छोट्या प्रमाणात होणारे लाईट स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव आहे, जे गर्भधारणेच्या ७-१० दिवसानंतर होते, आणि ते अगदी सामान्य आहे. जेव्हा फर्टिलाईज अंड गर्भाशयाच्या लाईनिंगला जुळतो तेव्हा इम्प्लांटेशन ब्लीडिंग होते.

ज्या लोकांनी पालक व्हायचे ठरवले आहे, त्यांच्यामध्ये इम्प्लांटेशन ब्लीडिंग सामान्य आहे का?

होय, इम्प्लांटेशन ब्लीडिंग हे गर्भधारणेचे सामान्य लक्षण आहे. जवळपास 1/3 गर्भवती महिलांना इम्प्लांटेशन ब्लीडिंगचा अनुभव येतो. बऱ्याच प्रकरणांत हे गर्भधारणेचे पहिले लक्षण असते.

इम्प्लांटेशन ब्लीडिंग कधी होते आणि ते किती काळ चालते?

हे सहसा अंडमोचनाच्या (ovulation) ७-१० दिवसानंतर होते. स्पॉटिंग (हलका रक्तस्त्राव) केवळ काही तांस किंवा तीन दिवसांपर्यंत असावे.

सामान्य मासिकपाळी (पीरियड) आणि इम्प्लांटेशन ब्लीडिंग यांच्यात काय फरक आहे?

तुमची मासिक पाळी ही हळू सुरू होते आणि नंतर जड होत जाते, कदाचित गुठळ्यांशी (clots) संबंधित असू शकते. ते ३ ते ७ दिवसांपर्यंत राहाते. रक्तस्त्रावाचे रंग चमकदार लाल असते आणि तीव्र वेदना होऊ शकते. उलट इम्प्लांटेशन ब्लीडिंग ही हलक्या स्वरुपाची असते आणि तशीच राहाते. त्यामुळे, संपूर्ण पॅड किंव टॅम्पॉन भरत नाही. फिकट गुलाबी ते तपकिरी किंवा काळ्या रंगाचे रक्तस्त्राव होते, मात्र अधून मधून लाल रक्त येऊ शकते. इम्प्लांटेशन ब्लीडिंग येऊ शकतो किंवा जाऊ शकतो किंवा काही तासांकरिता आपण थोडे स्पॉटिंग (हलका रक्तस्त्राव) पाहू शकताकिंवा १-३ दिवस चालू आणि बंद राहू शकते आणि पोटदुखी सामान्यत: सौम्य स्वरुपाची असते.

ते किती दिवस राहाते?

ते सामान्यत: १ ते ३ दिवसांपर्यंत राहाते.

हे सामान्य गर्भधारणा (normal conception) तसेच असिस्टेड रिप्रोडक्शनमध्ये (assisted reproduction) दिसून येते का ?

हो, इम्प्लांटेशन ब्लीडिंग हे सामान्य गर्भधारणा (normal conception) तसेच असिस्टेड रिप्रोडक्शनमध्ये (assisted reproduction) होऊ शकते. असिस्टेड रिप्रोडक्शनमध्ये एम्ब्रियो (embryo) प्रयोगशाळेत तयार केल्यानंतर त्यास गर्भाशयात (uterus) पाठवण्यात येते, आणि जेव्हा ते गर्भाशयाच्या लाईनिंगला जुळते तेव्हा इम्प्लांटेशन ब्लीडिंग होऊ शकते.

वैद्यकीय सल्ल्यासाठी कधी जायचे आणि या परिस्थितीत काय सल्ला दिला जातो?

जर तुम्हाला शंका असेल की तुम्ही गर्भवती असाल आणि तुम्हाला जबरदस्त रक्तस्त्राव होत असेल, तर मग तुम्ही वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. कारण ही समस्येची लक्षणे असू शकतात किंवा ते लवकर गर्भपाताचे (early miscarriage) लक्षणही असू शकते. त्याचबरोबर, आपण गर्भवती आहात, असा संशय घेण्यास आपल्याकडे इतर कोणतेही कारण नसल्यास या प्रकारचा रक्तस्त्राव मासिक पाळी असू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.