हैगराबाद Health Benefits of Dates : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहणे खूप अवघड गोष्ट बनली आहे. निरोगी राहण्यासाठी अनेक प्रकारच्या गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. या पौष्टिक गोष्टींमध्ये खजूर समाविष्ट आहे. तुम्ही सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात खजूर खाल्ल्यास अनेक आजार दूर होतात. यामध्ये फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात. जाणून घेऊया खजूर खाण्याचे अगणित फायदे (Benefits of Dates) .
पचनासाठी फायदेशीर : जर तुम्हाला पचनाच्या समस्या आहेत तर खजूर तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो. यासाठी काही खजूर पाण्यात काही वेळ भिजवून घ्या (wet dates) नंतर खा. रोज खजूर खाल्ल्यानं तुमची पचनक्रिया सुधारते. ( healthy digestion ) यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
हाडे मजबूतीसाठी खजूर : पोषक घटकांनी समृद्ध खजूर हाडे मजबूत करतात. खजूरमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यांचा आपल्या कमकुवत हाडांना फायदा होतो. यामध्ये सेलेनियम, मॅंगनीज, कॉपर आणि मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळतात, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यास मदत : जर तुम्ही रोज 4-6 खजूर खाल्ल्या तर वजन कमी होण्यास मदत होते. तुम्ही खजूर सकाळी न्याहारी म्हणून खाऊ शकता किंवा ग्रीन टीसोबत तुमच्या संध्याकाळच्या स्नॅकमध्ये समाविष्ट करू शकता. जंक फूड खाण्याची इच्छा नियंत्रित करण्यास खजूर मदत करते.
त्वचेसाठी खजूर उत्तम : खजूरमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-डी सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे तुमची त्वचा मुलायम होते. त्यात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील आहेत. खजूर खाल्ल्याने त्वचाही निरोगी राहते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर : खजूरमध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले असते. हे रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. साधे दही आणि खजूर मिसळून खाणे फायदेशीर ठरू शकते.
हेही वाचा :