देशात आणि जगभर जेवणात हिरव्या कोथिंबिरीच्या पानांचा उपयोग केला जातो. जगभरात कोथिंबीर वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. कोथिंबीर जेवणाची रंगत वाढवते, आस्वाद वाढवतेच. शिवाय अनेक आजार कोथिंबिरीमुळे दूर राहतात. यात अनेक पोषक तत्त्व असतात. प्रत्येक मोसमात मिळणारी ही कोथिंबीर किती फायदेशीर आहे, त्यात कुठली पोषक तत्त्व आहेत हे 'ईटीव्ही भारत'च्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत.
- कोथिंबिरीतली पोषक घटक
कोथिंबीर भरपूर पौष्टिक आहे. कोथिंबिरीच्या हिरव्या पानांमध्ये फायबर मुबलक असते. कोथिंबिरीत व्हिटॅमिन ए आणि सी, कॅल्शियम, मॅग्नीशियम, मॅगनीज, लोह, पोटॅशियम आणि प्रोटिन्स भरपूर असतात.
भारतीय स्वयंपाकघरात धणे किंवा त्याची पावडर मसाल्यात वापरली जाते. धण्याचे सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते. पचनशक्ती सुधारते. शौच साफ होते. कोथिंबिरीत अँटीबॅक्टीरियल आणि अँटीऑक्सिडेंट घटक असतात. यामुळे शरीरात होणाऱ्या संसर्गाशी लढण्यास शक्ती मिळते. कोथिंबीर त्वचेसाठी चांगली आहे.
कोथिंबिरीमुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातले कॅल्शियम, लोह आणि न्यूरोट्रांसमीटर एसिटाइलकोलाइन एकत्र येऊन रक्तवाहिन्यांवरचा ताण कमी करायला मदत करतात.
कोथिंबिरीचे फायदे आणि त्या संबंधी घरगुती उपाय
- हिरव्या कोथिंबिरीमुळे पचनशक्ती चांगली राहते. यामुळे पोटाच्या समस्या दूर होतात. ताकात कोथिंबिरीचा पाने टाकून ते प्यायले तर अपचन, मळमळ, पोटशूळ आणि कोलायटिसवर आराम मिळतो. यामुळे गॅस आणि पित्ताची समस्या देखील दूर होते.
- अतिसारावर कोथिंबिरीची चटणी फायदेशीर होते.
- पाणी कमी प्यायल्याने लघवीची समस्या उद्भवते. अशा वेळी धण्याचे सेवन केल्याने ही समस्या दूर होते.
- कोथिंबिरीत व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच. पण याबरोबर याच्या नियमित सेवनाने सर्दी–खोकलाही बरा होतो.
- पोटाच्या समस्येबरोबर तोंडातल्या जखमा आणि अल्सर कोथिंबिरीमुळे बरा होतो.
- कोथिंबिरीत मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे. यामुळे संधिवातावर ही फायदेशीर आहे.
- कोथिंबिरीमुळे शरीरातले कॉलेस्ट्रॉल कमी होऊन नियंत्रणात राहते. उच्च कॉलेस्ट्रॉल असले तर धण्याचे पाणी गरम करून प्यायले तर फायदा होतो.
- मधुमेह असेल तर धणे गुणकारी आहेत. याच्या सेवनाने रक्तातील इन्सुलीनचे प्रमाण नियंत्रणात राहते.
- नियमित धणे खाल्ल्याने स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या दूर होतात. मासिक पाळीत रक्तस्राव जास्त होत असेल तर धण्याचे पाणी पिऊन फायदा होतो.
- धण्याचे पाणी पिऊन पायांची होणारी जळजळ कमी होते.
- धण्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. त्याचे कार्य सुरळीत सुरू राहते.