ETV Bharat / sukhibhava

Healthy Drinks : उष्णतेपासून आराम देण्याबरोबरच 'ही' पेये शरीराला देतात पोषण

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी बरेच लोक आरोग्यास हानीकारक कोल्ड्रिंक्स ( Cold drinks harmful to health ) किंवा अशा पेयांचे सेवन करतात ज्यामध्ये अशा घटकांचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. पण अशी अनेक पेये आहेत ज्यांचे सेवन उन्हाळ्यात शरीराला नैसर्गिकरीत्या थंड ठेवतेच, पण ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात.

Healthy Drinks
Healthy Drinks
author img

By

Published : Apr 12, 2022, 10:50 PM IST

कडाक्याच्या उन्हात शीतपेये कोणाला प्यावेसे वाटत नाहीत, पण बाजारात मिळणारे बहुतेक कोल्ड्रिंक्स आणि जास्त साखरेचे पेय हे चवीला स्वादिष्ट असले तरी त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम खूप घातक असतात. त्यामुळे ऋतू कोणताही असो, डॉक्टर नेहमीच त्यांना टाळण्याचा सल्ला देतात.

मुंबईतील आहारतज्ञ आणि पोषणतज्ञ रुचेल जॉर्ज ( Dietitian and nutritionist Ruchel George ) सुचवतात की कोणताही ऋतू असो, लोकांनी जास्त प्रमाणात साखर असलेली पेये टाळावीत आणि कृत्रिम आणि हानिकारक पदार्थांचा वापर करु नये, कारण ते हाडे, पचन, यकृत आणि हृदयाला नुकसान पोहोचवू शकतात. अनेक संबंधित रोग आणि समस्यांचे कारण ठरु शकतात.

ताजे आणि नैसर्गिक पेयांचे सेवन फायदेशीर -

रुशेल सांगतात की, या हानिकारक शीतपेयांऐवजी ताज्या फळांपासून बनवलेले ज्यूस किंवा पौष्टिकतेने समृद्ध नैसर्गिक पेयांचा वापर केला, तर शरीर हायड्रेट तर राहतेच पण आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. अशी शीतपेये देखील उष्णतेचे शरीरावर होणारे परिणाम आणि नुकसान कमी करण्यास सक्षम आहेत.

रुचेल जॉर्ज यांनी ईटीव्ही भारत सुखीभवला उन्हाळ्यात आरोग्यासाठी कोणती पेये फायदेशीर ठरू शकतात याची सविस्तर माहिती दिली.

ताज्या फळांचा रस -

रुशेल जॉर्ज सांगतात की ऋतू कोणताही असो, ताज्या फळांचा रस ( Fresh fruit juice ) आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत: मोसमी फळांचे रस, शेक आणि स्मूदी हे आरोग्याला पोषक करण्यासोबतच आरोग्य चांगले ठेवतात. विशेषत: उन्हाळा आला की अशा ऋतूमध्ये टरबूज आणि वेल यांचे रस आणि मोसंबी आणि इतर फळांचे रस शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर खनिज घटकांचा पुरवठा करतात. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासोबतच ते शरीराची प्रतिकारशक्ती आणि चयापचय क्रिया मजबूत करतात, तसेच उन्हाळ्याच्या हंगामात उष्माघातासारख्या समस्यांपासून बचाव करतात.

लस्सी आणि ताक -

गोड लस्सी आणि खारट ताक ( Lassi and buttermilk ) या ऋतूत उष्णता दूर करण्याबरोबरच आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. ते दोन्ही दह्यापासून बनवलेले आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रो-बायोटिक गुणधर्म आहेत. याशिवाय, त्यात जीवनसत्त्वे-ए, सी, ई, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक आणि रोग प्रतिरोधक गुणधर्म आढळतात.

नारळ पाणी -

नारळ पाणी हे एक आदर्श पेय मानले ( Coconut water is ideal drink ) जाते. मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांनी समृद्ध, नारळाचे पाणी केवळ शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत करत नाही तर पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यासह अनेक प्रकारे शरीराला फायदेशीर ठरते. यामध्ये कॅलरीज खूप कमी असल्याने वजन कमी करण्यातही खूप मदत होते.

हर्बल सरबत -

या हंगामात बाजारात अनेक प्रकारचे हर्बल सरबत ( Herbal Syrup ) उपलब्ध आहेत जसे गुलाबाच्या पानांचे सरबत, खसखसचे सरबत इत्यादी. या ऋतूमध्ये हे हर्बल सरबत शरीराला नैसर्गिकरीत्या थंड तर करतातच शिवाय शारीरिक आणि मानसिक तणावही दूर करून शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. पण ते खरेदी करण्यापूर्वी त्यामध्ये साखरेचे प्रमाण तपासणे अत्यंत आवश्यक आहे.

लिंबूपाणी -

उन्हाळ्यात रोज किमान एक ग्लास लिंबू पाणी ( Lemonade ) प्यायल्याने शरीराला हायड्रेट तर राहतेच पण उष्णतेचा शरीरावर होणारा परिणामही तुलनेने कमी दिसतो. याशिवाय उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेसारख्या समस्यांपासूनही लिंबूपाणी आराम देते. लिंबूपाण्यात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि इतर खनिजे देखील आढळतात. जे शरीरातील चयापचय आणि प्रतिकारशक्ती सुधारतात. पण इथे हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे की दररोज लिंबू पाण्याचे सेवन अत्यंत संतुलित प्रमाणात केले पाहिजे.

ग्रीन टी -

थंडी असो वा गरम, ग्रीन टीचा ( Green tea ) शरीराला प्रत्येक प्रकारे फायदा होतो. ग्रीन टीचे जास्त सेवन करू नये असे डॉक्टर आणि तज्ज्ञांचे मत असले तरी, जर ते दररोज नियंत्रित प्रमाणात सेवन केले तर ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतेच, शिवाय त्यात आढळणारे अँटी-ऑक्सिडंट आणि रोग-प्रतिरोधक गुणधर्म असतात. संक्रमण, रोग आणि इतर समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

आंब्याच्या किंवा अननसाचे पन्ने -

रुशेल सांगता की आंब्याच्या पन्न्याबद्दल जवळपास सगळ्यांनाच माहिती आहे. आंब्याचे पन्नं हे कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्यांपासून बनवलेले पेय आहे, जे उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला खूप फायदे देते. पण आंब्याच्या पन्नासोबत अननसाचा पन्नाही बनवला जातो. आंबा आणि अननसाच्या गुणधर्मांव्यतिरिक्त, काळे मीठ, काळी मिरी, जिरेपूड, हिंग आणि पुदिन्याचा अर्क किंवा पाचूमधील पाने यासारखे मसाले त्यांचे औषधी गुणधर्म वाढवतात. ज्याचा पचनसंस्थेसह शरीराच्या अनेक यंत्रणांना फायदा होतो.

थंडाई -

उन्हाळ्यात थंडाईचे सेवन केल्याने शरीर नैसर्गिकरित्या थंड राहते. थंडाई हे अतिशय आरोग्यदायी पेय म्हणून वर्गीकृत आहे. कारण फक्त ड्रायफ्रुट्सच नाही तर काळी मिरी, वेलची, केशर यांसारखे औषधी गुणधर्म असलेले मसालेही त्यात वापरले जातात, जे शरीराच्या पोषणासोबतच शरीरात रोगप्रतिकारशक्तीही निर्माण करतात.

फुटाणा सरबत -

उन्हाळ्यात थंड प्रभावाने सत्तूचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो. फुटाण्यामध्ये प्रथिने, फायबर, सोडियम, लोह, मॅग्नेशियम आणि कार्बोहायड्रेट्स यांसारखे पोषक घटक आढळतात. फुटाण्याचा रस पाण्यात मिसळून सरबत प्रमाणे सेवन केल्याने शरीरावरील उष्णतेचा प्रभाव तर कमी होतोच, शिवाय शरीरातील रक्ताची कमतरताही कमी होते आणि शरीराला ऊर्जा देण्यासही मदत होते.

हेही वाचा - National Safe Motherwood Day 2022 : सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक स्त्रीचा हक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.