ETV Bharat / sukhibhava

सोशल मीडियातील 'लाइक' आणि 'शेअर'वर संशोधन, निष्कर्ष चकीत करणारे, वाचा... - Like Share Research William Brady

जाणीवपूर्वक व कधी सवयीमुळे नकळत दिवसातून अनेक वेळा लोक सोशल मीडियाच्या विविध प्लाटफॉर्मवर दुसऱ्या लोकांची पोस्ट लाइक किंवा शेअर करत असतात. मात्र, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार लाइक आणि शेअर या अभिव्यक्तीमुळे लोकांमध्ये नैतिक असंतोष वाढू शकतो.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Sep 16, 2021, 8:32 PM IST

Updated : Sep 16, 2021, 8:40 PM IST

सोशल मीडियाच्या विविध प्लाटफॉर्मवर कोणत्याही पोस्टला लाइक किंवा शेअरची संख्या केवळ पोस्ट करणाराच नव्हे तर, त्या पोस्टच्या प्रसिद्धीचे प्रतिक मानले जाते. मात्र, वर्तमान काळात या प्लाटफॉर्मवर भाषिक प्रदूषणाचा कल वाढू लागला आहे, म्हणजेच लोक आपल्या भावनांच्या अभिव्यक्तीसाठी अपमानास्पद किंवा संतप्त भाषा अधिक वापरू लागले आहेत. अशा भाषेचा वापर करणाऱ्यांना लाइक आणि शेअर अधिक मिळतात, हे देखील यामागचे एक कारण आहे.

येल विद्यापीठाच्या एका नव्या संशोधनातून असे लक्षात आले आहे की, ट्विटर सारखे सोशल मीडिया प्लाटफॉर्म लोकांमध्ये नैतिक आक्रोशच्या अभिव्यक्तीला वाढवतात, कारण असे केल्यास वापरकर्त्याला लाइक आणि शेअर अधिक मिळतात.

सोशल मीडिया उत्तेजना (social media stimuli) ऑनलाइन आपल्या राजकीय संभाषणाचे स्वर बदलण्यास सक्षम आहेत, असे या आभ्यासात येल विद्यापीठाचे पदव्युत्तर (मानसशास्त्र) संशोधक आणि लेखक विलियम ब्रेडी स्पष्ट करतात.

संशोधन विलियम ब्रेडी आणि त्यांचे सहयोगी प्राध्यापक मॉली क्रोकेट यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. या संशोधनादरम्यान संशोधकांनी वास्तविक जीवनात वादग्रस्त घटनांदरम्यान ट्विटरवर नैतिक आक्रोशाच्या अभिव्यक्तीचे मोजमाप केले. सोबतच सोशल मीडिया यंत्रणेची चाचणी करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नियंत्रण प्रयोगांमध्ये स्बजेक्ट्सच्या त्या वर्तनाची तपासणी केली जी यूजरला सोशल नेटवर्किंग साइटवर लोकप्रिय सामग्री टाकण्यासाठी पुरस्कृत करतात.

आभ्यासाच्या निष्कर्षात ब्रेडी सांगतात की, हे या बाबीचा पुरावा आहे की, काही लोक कालांतराने अधिक क्रोध व्यक्त करणे शिकतात, कारण त्यांना सोशल मीडियावर या प्रकारचे वर्तन दाखवण्यासाठी पुरस्कृत केले जाते.

संशोधक सांगतात की, या प्रकारचा नैतिक आक्रोश सामाजाच्या चांगल्यासाठी एक बळकट शक्ती देखील बनू शकते, जी नैतिक गुन्ह्यांसाठी शिक्षेला प्रोत्साहित करू शकते आणि समाजिक सहकार्य वाढवू शकते. पण, या प्रवृत्तीची एक काळी बाजू देखील आहे, जी अल्पसंख्याक गटांचा छळ, चुकीच्या माहितीचा प्रसार आणि राजकीय ध्रुवीकरणात योगदान देते.

उल्लेखनीय म्हणजे, फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया साइट्स, असा युक्तिवाद करतात की, ते कुठल्याही प्रकारच्या संभाषणासाठी एक तटस्थ व्यासपीठ देतात. मात्र, अनेक लोकांचा या विचारसरणीवर विश्वास आहे की, सोशल मीडियावरील हे वर्तन लोकांमध्ये रागाच्या प्रवृत्तीला उत्तेजन देते. पण, संशोधकांचा असा विश्वास आहे की, नैतिक आक्रोश सारख्या गुंतागुंतीच्या सामाजिक अभिव्यक्तींना अचूकपणे मोजणे हे एक तांत्रिक आव्हान आहे.

या आभ्यासांतर्गत डेटा एकत्रित करण्यासाठी ब्रेडी आणि क्रॉकेट यांच्या पथकाने एक मशीन लर्निंग सॉफ्टवेयर विकसित केले होते, जे ट्विटर पोस्टवर नैतिक आक्रोशवर नजर ठेवतो, ज्याच्या अंतर्गत 7 हजार 331 ट्विटर वापरकर्त्यांचे 12.7 मिलियन ट्विट्सचे निरीक्षण करण्यात आले, त्याचबरोबर वापरकर्त्यांनी कालांतराने अधिक संताप व्यक्त केला का? जर केला असेल तर, तो का केला? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या संशोधनात पथकाला दिसून आले की, सोशल मीडिया साइट्सचे प्रोत्साहन प्रत्यक्षात लोकांच्या पोस्ट करण्याच्या पद्धतीला बदलत आहे. जे वापरकर्ते अधिक 'लाइक' आणि 'रीट्विट' मिळवतात, त्यांच्या ट्विटमध्ये आणि नंतरच्या ट्विटमध्ये क्रोध व्यक्त करण्याची शक्यता अधिक असते. या निष्कर्षांचे समर्थन करण्यासाठी, शोधकर्त्यांनी नियंत्रित वर्तनावरही चाचण्या केल्या आणि निकालांच्या आधारे दाखवून दिले की, क्रोध व्यक्त करण्यासाठी पुरस्कृत वापरकर्त्यांनी काळानुरूप रागाच्या अभिव्यक्तीला वाढवले.

हे परिणाम राजकीय ध्रुवीकरणामध्ये सोशल मीडियाच्या भूमिकेबाबत प्रश्न निर्माण करतात. आभ्यासाच्या निकालांच्या आधारावर संशोधक सांगतात की, राजकीयदृष्ट्या सक्रिय नेटवर्कच्या सदस्यांच्या तुलनेत सोशल मीडिया साइट्सवर राजकीयदृष्ट्या उदार नेटवर्कच्या सदस्यांद्वारे अधिक क्रोध व्यक्त करण्यात आला.

क्रॉकेट सांगतात की, आमच्या आभ्यासातून हे माहीत होते की, राजकीयदृष्ट्या उदारवादी मित्र आणि अनुयायी लोक सामाजिक टिप्पण्यांप्रति अधिक संवेदनशील असतात, जे त्यांच्या संतप्त अभिव्यक्तींना बळकटी देतात.

क्रॉकेट असेही सांगतात की, हा आभ्यास या बाबीचा संकेत देत नाही की, नैतिक आक्रोशमध्ये वृद्धी ही समाजासाठी चांगली आहे किंवा वाईट. मात्र, या निष्कर्षांवर नेते आणि नीती निर्मात्यांद्वारे विचार केला जात आहे, जे त्यांना प्रतिबंधित करण्यासाठी साइट्सचा वापर करतात.

नैतिक आक्रोशचा विस्तार हा सोशल मीडियाच्या व्यापार मॉडलचा एक स्पष्ट परिणाम आहे, जो वापरकर्त्याच्या सहभागसाठी (user engagement) अनुकूल आहे. त्याचबरोबर, नैतिक आक्रोश सामाजिक आणि राजकीय परिवर्तनात एक महत्वाची भूमिक बजावतो. आपल्याला याची जाणीव असावी की, तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या साइट्सच्या डिझाइनच्या माध्यमातून सामूहिक आंदोलनाच्या यशाला किंवा अपयशाला प्रभावित करण्याची क्षमत ठेवतात.

हेही वाचा - त्वचेवरील सुरकुत्यांपासून मुक्त व्हायचय? 'ही' माहिती ठरू शकते फायदेशीर

Last Updated : Sep 16, 2021, 8:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.