ETV Bharat / entertainment

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या चॅट लीकबद्दल केलं भाष्य, काय आहे प्रकरण जाणून घ्या... - SAMEER WANKHEDE

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणी आता समीर वानखेडे यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी शाहरुख खानच्या चॅट लीकबद्दल एक महत्वपूर्ण माहिती शेअर केली आहे.

aryan khan drugs case
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण (आर्यन खान ड्रग्ज प्रकरण - फोटो - सोशल मीडिया)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 2, 2025, 12:42 PM IST

मुंबई : 2021 हे वर्ष शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप वाईट ठरलं होतं. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्या गेलं होतं. जामीन मिळण्यापूर्वी आर्यन खानला 25 दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. आता यानंतर आर्यनला त्याच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्त मिळाली आहे. दरम्यान त्यावेळी समीर वानखेडे हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर होते. ड्रग्ज प्रकरणी तपास करून त्यांनी आर्यन खानला अटक केली होती. आता अलीकडेच समीर वानखेडे यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानची चॅट लीक झाल्याबद्दल आणि आर्यनला सोडवण्यासाठी लाच घेतल्याचा आरोपावर त्यांनी एक खुलासा केला आहे.

समीर वानखडेवर चॅट लीकचा आरोप : एका मुलाखतीमध्ये समीर यांना विचारण्यात आलं की, शाहरुखच्या मुलाला अटक केल्यामुळे मीडियानं त्यांना टार्गेट केलं आहे का?, यावर वानखडे यांनी उत्तर दिलं, "मला टार्गेट करण्यात आलं, मी असं म्हणणार नाही. मी खूप भाग्यवान आहे असं, मी म्हणेन कारण मला मध्यमवर्गीयांचं प्रेम मिळालं. कोणी कितीही मोठा असला तरी, प्रत्येकानं नियम पाळले पाहिजेत. याप्रकरणी मला कसलाही पश्चाताप नाही. मला पुन्हा संधी मिळाली तर मी तेच करणार." पुढं त्यांना शाहरुख खानच्या चॅटबाबत विचारण्यात आलं, यावर त्यांनी म्हटलं, "न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिल्यामुळे मी यावर बोलू शकत नाही, मात्र समीर यांनी चॅट लीक केल्या नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. याशिवाय त्यांनी म्हटलं, "मी इतका कमकुवत नाही की, मी गोष्टी लीक करेल."

25 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावर समीर वानखडे यांचं उत्तर : यानंतर शाहरुख आणि आर्यनला पीडित दाखवता यावं म्हणून हे जाणूनबुजून केलं असल्याच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं, "ज्यानं हे केलं त्याला मी सांगेन की कृपया आणखी प्रयत्न करा." आर्यनला सोडवण्यासाठी 25 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावर त्यांनी सांगितलं, "मी आर्यनला सोडले नाही, उलट मी त्याला पकडले होते. याप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे." समीर वानखेडे यांच्या टीमनं आर्यन खानला त्रास दिल्याच्या आरोपावर त्यांनी म्हटलं, "मी कोणत्याही मुलाला अटक केली, असं मला वाट नाही. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग यांनी देशासाठी प्राण दिले होते. त्याला तुम्ही मूल म्हणू शकत नाही." या मुलाखतीनंतर खूप काही गोष्टी आता समोर आल्या आहेत.

हेही वाचा :

  1. शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू सीरीजची झाली घोषणा, कंगना राणौतनं केलं कौतुक
  2. शाहरुख खानला आयफा 2024मध्ये आर्यन खानच्या अटकेचे दिवस आठवले, म्हणाला- 'टफ टाइम' - IIFA 2024
  3. आर्यन खान-लॅरिसा बोन्सी आणि सुहाना-अगस्त्य नंदा हे कथित कपल्स मुंबईमधील इव्हेंटमध्ये झाले स्पॉट - aryan and suhana khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.