हैदराबाद : श्रीलंका पोलिसांच्या सोशल मीडिया अकाउंट्स आणि सरकारच्या प्रिंटर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर मंगळवारी सायबर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की, YouTube, Facebook, Instagram, TikTok आणि X वर खात्यांवर हा हल्ला करण्यात आला. पण यानंतर, यूट्यूब वगळता सर्व काही पुन्हा सुरू करण्यातं आलं. ते म्हणाले की हॅकर्सची ओळख पटली असून तपास सुरू आहे.
"YouTube, Facebook, Instagram, TikTok आणि X (पूर्वीचे Twitter) हल्ला झालाय. आतापर्यंत आम्ही YouTube वगळता सर्व प्लॅटफॉर्मवर आमचं नियंत्रण मिळवलयं." हॅकरची ओळख पटली असून त्याची चौकशी सुरू आहे. - केबी मंथुंगा, पोलीस अधीक्षक
सरकारी विभागाची वेबसाइटही हॅक : सरकारी एजन्सी 'कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' (CERT) नुसार, पोलिसांच्या सोशल मीडिया खात्यांव्यतिरिक्त, सरकारच्या प्रिंटर विभागाची अधिकृत वेबसाइट देखील हॅक करण्यात आलीय. हल्ल्यामागील गटाची अद्याप ओळख पटलेली नाहीय. सीईआरटीनं सांगितलं की, ज्या वेबसाइटवर सर्व सरकारी प्रकाशने आणि महत्त्वाच्या घोषणा प्रकाशित केल्या जातात ती वेबसाइट हॅक करण्यात आलीय.
सायबर हल्ल्यापासून सावध रहा : गुन्हे तज्ज्ञांच्या मते या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यापासून सुरक्षित राहण्याचा मार्ग म्हणजे जागरूक राहणे गरजेचं आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुमची माहिती शेअर करणं प्रत्येकानं टाळलं पाहीजे. तज्ज्ञांच्या मते, मुलांची फसवणूक होत असेल, तर त्याची जाणीव मुलांना करून देण्याची जबाबदारी पालकांची आहे. कारण फसवणूक करणारे अनेकदा मुलांना वेगवेगळ्या मार्गानं लक्ष्य करतात आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.
'हे' वाचंलत का :