ETV Bharat / state

Special Story : काय सांगता?.. यवतमाळच्या अब्बासने कागदावर उकळला चहा - Farmer made Tea in Paper Pot

शेतात जागलीवर असलेल्या युवा शेतकऱ्याला चहाची रात्री दरम्यान तलब आली. ( Farmer made Tea in Paper Pot ) त्याने कागदाच्या गंजावर चहा बनवून चहाचा अस्वाद घेतला. ( Yawatmal Farmer made Tea in Paper Pot )

Yawatmal Farmer made Tea in Paper Pot
यवतमाळच्या अब्बासने कागदावर उकळला चहा
author img

By

Published : Nov 30, 2021, 1:35 PM IST

यवतमाळ - आतापर्यंत तुम्ही सर्वांनी चहाचे वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. त्याला बनविण्याची वेगवेगळ्या पद्धतीही पाहिल्या असतील. मात्र, कागदावर चहा उकळता येतो, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क कागदावर चहा उकळत त्याचा आस्वाद घेतला. शेतात जागलीवर असलेल्या युवा शेतकऱ्याला चहाची रात्री दरम्यान तलब आली. ( Farmer made Tea in Paper Pot ) मात्र, शेतातून कुणीतरी चहा बनवण्याचा गंज चोरून नेल्याने चहा कसा बनवायचा? असा प्रश्न अब्बास भाटी या शेतकऱ्यासमोर पडला. तितक्यात त्याला एक कल्पना सुचली आणि त्याने कागदाच्या गंजावर चहा बनवून चहाचा अस्वाद घेतला. ( Yawatmal Farmer made Tea in Paper Pot )

प्रतिक्रिया

अब्बासचा मॅजिक चहा घेतो कागदावरच ऊकळी -

आर्णी तालुक्यातील दाभडी या गावात 20 मार्च 2014साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'चाय पे चर्चा' करून संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता. तेव्हा दाभडीच्या चहाची चर्चा संपुर्ण भारतभर झाली होती. मात्र, आता आर्णी तालुक्यातील कावठा बाजार येथील शेतकरी अब्बास अली भाटी हे शेतात जागलीवर असताना त्यांचा चहाचा गंज कुणीतरी चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र, चहाची तलब आली असताना त्यांना एक कल्पना सुचली. त्याने विटांची चुल, काडीचा विस्तव आणि कागदाचा गंज करून तयार चहा तयार केला. आगीजवळ कागद नेला तर क्षणात जळुन खाक होतो. मात्र, अब्बासने या आग ओकणाऱ्या विटांच्या चुलीवर कागदाचा गंज करून त्यामध्ये पाणी, दुध, चहापत्ती, साखर, विलायची टाकुन चवदार चहा करून तलब भागवली. या चहाची चर्चा संपुर्ण तालुक्यात होत आहे. म्हणूनच हा कागदावर ऊकळी घेणारा चहा तालुक्यातील चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा - Sonalee Kulkarni Interview : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत पांडू चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.