ETV Bharat / state

Woman commits suicide : पतीच्या निधनानंतर साडीचा गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, फास सैल झाल्याने बचावली चिमुकली

author img

By

Published : Jun 7, 2022, 8:46 PM IST

काही वर्षांपूर्वी रोशनी या महिलेचा हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील आशिष झाडे यांच्याशी विवाह ( Roshani Zade suicide attempt ) झाला होता. यांच्या या संसाररूपी वेलीवर एक कन्यारत्नसुद्धा जन्माला ( Kids life saved in suicided case ) आले. असाच यांचा सुखाने संसार सुरू असताना मागील दोन महिन्यापूर्वी आशिष झाडे यांचा आकस्मित मृत्यू झाला. त्यामुळे महिला मार्डी येथे माहेरी आली होती.

महिलेचा मृत्यू
महिलेचा मृत्यू

मारेगाव ( यवतमाळ )- पतीच्या मृत्यूच्या पश्चात विरहात जीवन जगत असलेल्या एका महिलेने आपल्या 9 महिन्याच्या चिमुकलीसह साडीचा गळफास घेऊन आत्महत्या ( Women Suicide attempt ) केली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला. सुदैवाने फास सैल झाल्याने यात चिमुकली बचावली ( Yavatmal woman suicided attempt ) आहे. ही घटना मार्डी येथे आज सकाळी उघडकीस आली. रोशनी आशिष झाडे (वय अंदाजे 24) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर बाळावर सध्या वणीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पतीच्या निधनानंतर महिला तणावात-पतीच्या निधनानंतर रोशनी ही सतत मानसिक तणावात होती. आपण मुलीचा सांभाळ कसा करायचा, अशा विवंचनेत होती. आज मंगळवारी दिनांक 7 जून रोजी रोशनीचे वडील हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तर महिलेची आई घराबाहेर होती. ही संधी साधून महिलेने सकाळी साडे 6 ते 7 वाजताच्या दरम्यान तिच्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन घरातील पंख्याला गळफास साडीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने ही घटना उघडकीस आली. यात रोशनीचा मृत्यू झाला होता.

फास सैल झाला आणि चिमुकली बचावली- रोशनी ही आपल्या एका मुलीसह राहात होती. मुलीची जबाबदारी आणि पतीच्या अकाली मृत्यूमुळे रोशनी ही एकाकी झाली होती. त्यातून ती मानसिक तणावात गेली होती. त्यामुळे तिने चिमुकलीसह आत्महत्या करण्याचा निश्चय केला. चिमुकलीच्या गळ्यातील साडीचा फास सैल झाला. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा बाळ जिवंत असल्याचे आढळून आले. त्यामुळे बाळाला लगेच वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या बाळावर उपचार सुरू आहेत.

घटनेमुळे परिसरात हळहळ-अवघ्या दोन महिन्याच्या कालावधीत आई व वडिलांचे छत्र हरवल्याने 9 महिन्यांची चिमुकली पोरकी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोशनीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथे आणण्यात आला आहे. मारेगाव पोलीस ( Moregaon Police in Yavatmal ) घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा-Sidhu Musewala Murder Pune Connection : शार्प शूटर संतोष जाधव हा गवळी गँगचा प्यादा!

हेही वाचा-Chargesheet in Court by Cyber Police : बीटकाॅईन गुन्ह्यातील आरोपीं विरोधात दोषारोपत्र न्यायालयात दाखल; सहा कोटींची क्रिप्टो करन्सी जप्त

हेही वाचा- Baramati Crime : बारामतीत गुंडाचा महिलेवर बलात्कार; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.