यवतमाळ - तालुक्यातील अर्जुना गावात ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्र क्रमांक 312 मध्ये वॉर्ड क्रमांक 2 मधील यंत्रात तांत्रिक बिघाड आल्याने दुपारी 1 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया बंद पडली आहे.
अर्जुना येथील मतदान केंद्र क्रमांक 312 मध्ये वॉर्ड क्रमांक 2 मधील यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विभागीय अधिकारी, केंद्राध्यक्ष यांची भंबेरी उडाली. मतदार रांगेत उभे राहून थकले आहेत. आजारी असलेले वृद्ध व्यक्ती, अंध व्यक्ती मतदान करण्यासाठी केंद्रावर आले आहेत. त्यांनाही ताटकळत बसून राहण्याची वेळ आली. दुपारी मोठ्या प्रमाणात मतदार मतदान करण्यासाठी केंद्रावर आले. मात्र, मशीन बंद पडल्याने अनेकांनी घरचा रस्ता धरला. दुपारपर्यंत 50 टक्के मतदान झाले. अजूनही मतदान बाकी आहे. केंद्रांवरील अधिकारी वर्गाला माहिती देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर उशिरा मशीन बदलविणे सुरू केले आहे. त्याला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.