ETV Bharat / state

प्रहारच्या उमेदवार वैशाली येडेंना दुबईतून मदत - विकास गुतळवाड

प्रहारच्या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली येडेंना विकास गुतळवाड या तरुणाने दुबईतून २३०० रुपयांची मदत पाठवली आहे.

वैशाली येडे
author img

By

Published : Mar 29, 2019, 10:01 PM IST

यवतमाळ - बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. येडेंना निवडणूक लढविण्यासाठी मदत व्हावी, यासाठी विकास गुतळवाड या तरुणाने दुबईतून २००० रुपयांची मदत पाठवली आहे.

विकास गुतळवाड

यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन एका शेतकऱ्याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दुःख मांडताना, शेतकऱ्यांना लढाईचे आवाहन केले होते. त्यामुळे प्रहारचे पक्षप्रमुख बच्चू कडू यांनी त्यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी दिली. येडे या विधवा असून त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडून लोकवर्गणी गोळा केली जात आहे. आज त्यांना दुबई येथे मजुरी करणाऱ्या विकासने २००० रुपयांची मदत पाठवली आहे.

विकास म्हणाला, आजपर्यंत अनेक उमेदवार पाहिले. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी व्यक्तीला उमेदवारी दिल्याने मीही छोटीशी मदत करत आहे. आतापर्यंत प्रहारने लोकवर्गणीमधून ६० हजार रुपये जमा झाले आहे. आमच्या कामाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती प्रहारचे राज्य प्रमुख प्रमोद कुदळे यांनी सांगितले.

Intro:शेतकरी दुःखाच्या संवेदना साता समुद्रापार....
प्रहारच्या उमेदवार
वैशालीताई येडे यांना दुबईतून मदतBody:यवतमाळ- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातून प्रहारची उमेदवारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीस देण्याचा निर्णय पक्षप्रमुख आमदार बच्चूभाऊ कडू यांनी घेतला.
यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन
शेतकरी विधवा पत्नी वैशाली ताई येडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दुःख मांडताना, शेतकऱ्यांना लढाईचे आव्हानही केलं होतं. प्रहरची उमेदवारी त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारली आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या शेतकरी लढ्याला समर्पित होऊन
एकल महिला,परीतक्त्या,विधवा यांच्या प्रश्नावर
ही लढाई त्या लढत आहेत. अंगणवाडी मदतनीस असलेल्या हलाखीच्या परिस्थिती मधील या गरीबाच्या लेकीला आज लोकसभेच्या निवडणूकीसाठी राज्य, देश आणी विदेशातूनही मदत मिळते आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या प्रहारच्या उमेदवार वैशाली येडे शेतकरी विधवा असून त्याची हलाखीची आर्थिक परिस्थती आहे, वैशाली येडे निवडणूक लढवीत असताना लोकवर्गणी मोठ्या प्रमाणात प्रहार कडून केली जात असून या लोकवर्गणीतुन त्या निवडणूक लढवीत आहेत. आज याच वैशाली येडे यांना दुबई येथे मजुरी करणाऱ्या विकास गुतळवाड या युवकाने २३०० रुपये मदत पाठवली असून या मदतीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. आज पर्यंत अनेक उमेदवार पाहिले मात्र सर्व सामान्य कुटूंबातील शेतकरी कुटूंबातील व्यक्ती ला उमेदवारी दिल्याने त्याच्या निवडणुकीला माझा कडून थोडी मदत मी पाठवली असल्याचे त्यानी सांगितले. तर आता पर्यन्त प्रहार जमा केलेल्या लोकवर्गणी ममध्ये ६० हजार रुपये जमा झाले असून लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे प्रहार राज्य प्रमुख प्रमोद कुदळे यांनी सांगितले.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.