यवतमाळ - 22 वर्षीय तरुणाच्या खुनानंतर गोरसेनेच्यावतीने शुक्रवारी १७ डिसेंबरला पुसद येथे महाआक्रोश मोर्चाचे ( Gorsenas Aakrosh Morcha in Yavatmal ) आयोजन केले आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे. आक्रोश मोर्चात सहभागी झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने ( Yavatmal SP on Mahaakrosh Morcha ) दिला आहे.
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत येथे ३ डिसेंबरला श्याम राठोड या २२ वर्षाच्या तरुणाची क्षुल्लक कारणावरून तलवारीने निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर परिसरात दगडफेक, जाळपोळची घटना घडली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाच जिल्ह्यातील एक हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी तैनात केले आहेत.
हेही वाचा-सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, नातेवाईकांची भूमिका
काळी दौलतखानमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मात्र, घटनेच्या निषेधार्थ गोरसेनेच्यावतीने शुक्रवारी १७ डिसेंबरला पुसद येथे महाआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी गोरसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून महाआक्रोश मोर्चा काढू नये, असे सांगितले. मात्र, गोरसेना मोर्चा काढण्यावर ठाम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली. या महाआक्रोश मोर्चात कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील ( SP Dilip Bhujbal on Gorsenas Aakrosh ) यांनी केले आहे. सहभागी झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
हेही वाचा-VIDEO : पुसद तालुक्यातील काळी गावात दोन गटात तणाव; घटनास्थळी पोलीस दाखल
प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुसदसह जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. यानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे काळी दौलत येथे घटनेच्या १५ दिवसानंतरही पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे.
हेही वाचा-फासे पारधी समाज आजही मुलभूत सुविधांपासून वंचित, देश स्वतंत्र झाला का? हेही माहिती नाही
काय घडली होती घटना?
काळी दौलतखान या गावात दुचाकीवरून जाताना एका तरुणाला दुचाकीचा कट लागला. यावरून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर होऊन श्याम शेषराव राठोड (वय 22 वर्षे) या तरुणावर तलवारीने हल्ला करून त्याचा खून ( Yavatmal Kali Daulat youth murder case ) करण्यात आला. त्यामुळे या गावात दोन गटात तणाव निर्माण झाला. तणाव चांगलाच वाढला असून गावातील रात्रीच्या सुमारास दुकानाची जाळपोळ करण्यात आली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्याचा मारा पोलिसांकडून करण्यात आला होता.