यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणाला तब्बल वीस दिवस झाले. रविवारी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना समर्थकांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय राजीनामा मंजूर करुन नये, अशी मागणी केली आहे.
राठोड सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे
आमदार संजय राठोड हे बंजारा समाजाचे असले तरी सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. मागील वीस वर्षापासून दारव्हा-दिग्रस मतदार संघाचा जो कायापालट झाला जे विकास झालेला आहे तो राठोड यांच्या मुळेच झालेला आहे. या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपासही करत आहेत. या तपासाचा निष्कर्ष निघण्यापूर्वीच राठोड यांचा राजीनामा घेणे चुकीचे असल्याचे समर्थकांनी सांगितले.
विरोधकांच्या दबावामुळे राजीनामा
संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हा विरोधकांच्या दबावामुळे घेण्यात आला आहे. विरोधक केवळ राजकारणासाठी ही मागणी करत आहे. यातील एकाही विरोधकांनी राठोड यांच्या मतदारसंघात येऊन बोलावे त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येईल, असा इशाराही समर्थकांनी दिला.
हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यात ४ दिवसात कोरोनाचे अकरा मृत्यू