ETV Bharat / state

यवतमाळातील बोरगाव येथे ११० वर्ष जुनी परंपरा; पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिरावर भरतो पोळा - pola festival spacial celebration

बोरगाव येथे स्वातंत्र्यापूर्वीपासून पोळा दोन दिवस साजरा करण्याची परंपरा असून ती परंपरा आजही कायम आहे. येथील रामभक्त मानुदास महाराज यांच्या मठावर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या दरम्यान गावातील सर्व शेतकरी बांधव हा सण साजरा करतात.

पोळा
author img

By

Published : Aug 31, 2019, 8:13 PM IST

यवतमाळ - अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जगाच्या पोशिंद्याच्या खांद्याला खांदा लावून राबणारा जिवाभावाचा साथीदार म्हणजे बैल. त्याच बैलाचा सण म्हणून पोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. त्याच अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी पोळा हा सण एक ते दोन दिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान, आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथील रामभक्त मानुदास महाराजांच्या मंदिरावर पोळा साजरा करण्याची परंपरा तब्बल ११० वर्षांपासून सुरु आहे.

यवतमाळातील बोरगाव येथे ११० वर्ष जुनी परंपरा

पोळा हा सण बैलांचा असला तरीही, हा सण उत्साहात साजरा करण्यासाठी बैलांचा घरधनी सर्व अडचणींवर मात करुन पोळ्याच्या दिवशी सर्जा-राजाला सजविण्यासाठी कमी पडू देत नाही. विशेष म्हणजे पोळा हा सण श्रावण महिन्यात येत असल्याने, या दरम्यान शेतात कोणतेही पिक येत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसतात. मात्र तरीही पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो हे विशेष.

बोरगाव येथे स्वातंत्र्यापूर्वीपासून पोळा दोन दिवस साजरा करण्याची परंपरा असून ती परंपरा आजही कायम आहे. येथील रामभक्त मानुदास महाराज यांच्या मठावर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या दरम्यान गावातील सर्व शेतकरी बांधव बैलांना सजावून आणतात. दरम्यान, हा उत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिक येथे जमतात. दरम्यान, या उत्सवाला यावर्षी ११० वर्षे पूर्ण झाली आहेत.

Intro:Body:यवतमाळ : अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जगाच्या पोशिंद्या यांच्या खांद्याला खांदा लावून बाराही महिने राबराब राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवाभावाचा साथी म्हणुन बैलाला मानल्या जाते. त्याच बैलाचा सण म्हणुन पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. त्याच अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी पोळा हा सण प्रमुख्याने एक ते दोन दिवस साजरा करण्यात येते. अशात आर्णी तालुक्यात बोरगांव येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येथील रामभक्त मानुदास महाराज यांच्या मंदिरावर पोळा साजरा करण्याची परंपरा तब्बल ११० वर्षा पासून सुरू आहे.
पोळा हा सण बैलाचा असला तरी तो सण उत्साहात साजरा करण्यासाठी बैलाचा घरधनी सर्व अडचणी वर मात करून पोळ्याच्या दिवशी सर्जाराजाला सजविण्यासाठी उसणेवारी काढून पोळ्याचा उत्सव साजरा करतो. विशेष म्हणजे पोळा हा सण श्रावम महिन्यात येत असल्याने त्या दरम्यान शेतात कोणताही पिक येत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसे नसतात असे असले तरी पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जाते हे विशेष.
बोरगांव येथे स्वतंत्रापुर्वी पासून पोळा दोन दिवस साजरा करण्याची परंपरा सुरू असून आजही ती परंपरा कायम आहे. येथील रामभक्त मानुदास महाराज यांच्या मठावर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आठ वाजता दरम्यान गावातील सर्व शेतकरी बांधव बैलांना बाशिंग, झुल आणि सजावट करून आणतात. त्या दरम्यान गावातील हजारो नागरिक उपस्थित असतात. यावेळी एकमेकांवर झडत्या बोलून उत्साह साजरा करित आहे.आज या परंपरेचा ११० वर्ष पुर्ण झाले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.