यवतमाळ - यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तूरीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र, पीक विमा कंपनी आपल्या जाचक अटी समोर ठेवून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकांच्या विम्याची मदत तातडीने मिळावी यासाठी सोमवारी (ता.28 डिसेंबर) खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीला घेराव घालो आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार. शेतकऱ्यांचा प्रश्न संसदेतही मांडू आणि वेळ पडल्यास न्यायालयाचीही दरवाजे ठोठाऊ, अशी भूमिका खासदार भावना गवळी यांनी घेतली आहे.
पीकविमा कंपनीच्या विरोधात खासदार गवळींच्या नेतृत्वात सोमवारी आंदोलन
पीक विमा कंपनी आपल्या जाचक अटी समोर ठेवून शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळू देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकांच्या विम्याची मदत तातडीने मिळावी यासाठी सोमवारी (ता.28 डिसेंबर) खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात पिक विमा कंपनीला घेराव घालो आंदोलन करण्यात येणार आहे.