यवतमाळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोहरागडावर गर्दी प्रकरणी कारवाईचे आदेश दिले. यासंदर्भात वनमंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राची चिंता आहे. पोहरादेवी येथे गर्दी झाली. मात्र, लोकं स्वतःहून आले, मी नियम पाळावे अशा सूचना केल्या होत्या. दहा दिवस मी संपर्कात नसल्याने आणि माध्यमांमध्ये उलटसुलट चर्चा असल्याने लोकं मोठ्या संख्येने जमा झाले. मी पोहरागड येथे दर्शनासाठी गेलो होतो, असे मंत्री राठोड म्हणाले.
यवतमाळ येथे आल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतला. पाच तालुक्यात रुग्ण वाढत आहेत. 26 फेब्रुवारीपर्यंत पॉझिटिव्ह संख्या कमी न झाल्यास पाच तालुक्यात लॉकडाउन घोषित होण्याची शक्यता वर्तवली. आहे.
पोहरादेवी गर्दी प्रकरण : प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. कोरोनाच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच वाशिमचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेत आढावा घेतला. तसेच मुंबई-महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
हेही वाचा - पोहरादेवी गर्दी प्रकरण : प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे