यवतमाळ - अवैधपणे उपसाकरून रेती वाहतूक करणार्यांविरोधात महसूल विभागाने कारवाईचे हत्यार उपसले आहे. बाभुळगाव, कळंब तसेच अकोला बाजार मार्गे शहरात येणारे वाळूचे आठ ट्रक उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदारांच्या पथकाने पकडले आहे. या ट्रक चालकांना जवळपास 17 लाखांचा दंड ठोठावला आहे.
जिल्ह्यातील रेती घाटांचा अद्याप लिलाव झालेला नाही. त्यामुळे चोर मार्गाने शहरात रेतीची वाहतूक सुरू आहे. शहरात येणार्या वाहनांविरोधात नाकाबंदी सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात येणारा रेतीसाठा जप्त केला जात आहे. शहरात बाभुळगाव, अकोला बाजार तसेच आर्णी मार्गाने वाळू घेऊन ट्रक येत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी तसेच तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या नेतृत्वात दोन पथक तयार करण्यात आले. दोन्ही पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली.
आठ ट्रॅक करण्यात आले जप्त -
या कारवाईत आठ ट्रक जप्त करण्यात आले. त्यांना प्रत्येकी एक लाख 55 हजाराप्रमाणे जवळपास 17 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. या ट्रकमधून जवळपास 24 ब्रास रेती जप्त करण्यात आली. या कारवाईत एमएच 31 सीक्यू 7491, एमएच 40एन 1629, एमएच 04 एफएल 5528, एमएच 29 बीई 7075, एमएच 31 सीक्यू 9286, एमएच 40 एन 1199, एमएच 40 7456, एमएच 29 बीई 0019 या क्रंमाकांचे आठ ट्रक जप्त करण्यात आले.
आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई -
वाळू चोरट्यांविरोधात गेल्या काही महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. यापूर्वीही अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मात्र, गेल्या काही महिन्यांतील ही मोठी कारवाई मानल्या जात आहे.
हेही वाचा - 'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा..