ETV Bharat / state

...तर कंपनीला काळ्या यादीत टाकू; खासदार भावना गवळी यांची धमकी

author img

By

Published : Apr 18, 2021, 6:07 PM IST

दहा दिवसांत लेडी हार्डींग हॉस्पिटल तयार करा, येत्या 10 दिवसांत जर हॉस्पिटल कोरोना रूग्णांसाठी तयार झाले नाही, तर सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी धमकी खासदार भावना गवळी यांनी दिली.

if hospital will not built in ten days then company will be blacklistedn said bhavana gawali in yavatmal
...तर कंपनीला काळ्या यादीत टाकू; खासदार भावना गवळी यांची धमकी

यवतमाळ - जिल्ह्यात वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता खासदार भावना गवळी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथील लेडी हार्डींग हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी दहा दिवसांत हे रुग्णालय तयार करण्याच्या सुचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तृषार वारे व संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या 10 दिवसांत जर हॉस्पिटल कोरोना रूग्णांसाठी तयार झाले नाही, तर सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

प्रतिक्रिया

वायुसेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन द्यावे-

जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांना लागणाऱ्या औषधी, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन हे वायूमार्गाने उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी केंद्राकडे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांनी राजकारण बाजूला सारत आरोग्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न सोडविला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

हेही वाचा - सोलापुरात तयार होतोय 'रेमडेसिवीर इंजेक्शन'चा कच्चा माल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.