ETV Bharat / state

'सॅनिटायझर' पाजल्याप्रकरणी आरोग्य मंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश - मुंबई पोलिओ डोस बातमी

यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. ही अक्षम्य चूक असून याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मंत्री राजेश टोपे
मंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Feb 2, 2021, 3:37 PM IST

Updated : Feb 2, 2021, 4:11 PM IST

मुंबई - यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली होती. ही अक्षम्य चूक असून याबाबत अंगणवाडी सेविका व आशा कर्मचाऱ्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

बोलताना मंत्री टोपे

तिघांचे झाले निलंबन

डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर बेतला असून या प्रकरणी केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका व आशा कर्मचारी या तिघांनाही यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी तत्काळ निलंबित केले आहे.

हेही वाचा - धक्कादायक! चिमुकल्यांना पोलिओ डोसऐवजी पाजले सॅनिटायझर

Last Updated : Feb 2, 2021, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.