यवतमाळ - दुकानातून तंबाखू आणून देण्याचा बहाण्याने घरात नेऊन पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार वणी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या गणेशपूर येथे घडला. या प्रकरणी 59 वर्षाच्या छबन आस्कर वृद्धास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - बायको कपडे धुवायला सांगायची म्हणून वैतागलेल्या नवऱ्याची आत्महत्या; पुण्यातील घटना
शहरालगतच असलेल्या गणेशपूर येथील पाच वर्षीय चिमुकली गेल्या 5 डिसेंबरला (गुरुवारी) घराजवळ खेळत होती. त्यावेळी घरासमोर राहत असलेल्या संशयित छबन आस्कर या वृध्दाने तिला दुकानातून तंबाखू पुडी आणून देण्याकरिता बोलावले. तिला घरात नेऊन तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. घाबरलेल्या मुलीने वृध्दाच्या तावडीतून सुटका करून घेत पळ काढला. घरी तिने घडलेला प्रसंग आई-वडिलांना सांगितला. घटनेच्या पाचव्या दिवशी मुलीच्या पालकांनी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
हेही वाचा - अनैतिक संबंधाच्या संशयातून गळा दाबून पत्नीची हत्या; आरोपी पतीला अटक
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांनी तातडीने संशयित छबन आस्कर याला लालगुडा परिसरातून अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.