ETV Bharat / state

यवतमाळात बनावट हॉल तिकीट बनवणाऱ्या सायबर कॅफे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल - बनावट हॉल तिकीट यवतमाळ प्रकरण

सायबर कॅफे चालकाच्या चुकीमुळे काही विद्यार्थिनी नीट परीक्षेपासून वंचित राहिल्या होत्या. दरम्यान यामध्ये धक्कादायक बाब पुढे आली आहे. याप्रकरणी सायबर कॅफे चालकावर आज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

case registered against cyber cafe operator in yavatmal
बनावट हॉल तिकीट यवतमाळ प्रकरण
author img

By

Published : Jul 24, 2022, 12:26 PM IST

यवतमाळ - सायबर कॅफे चालकाच्या चुकीमुळे काही विद्यार्थिनी नीट परीक्षेपासून वंचित राहिल्या होत्या. दरम्यान यामध्ये धक्कादायक बाब पुढे आली आहे. कॅफे चालकाने दुसऱ्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट डाऊनलोड केले. त्यानंतर त्यामध्ये नाव, पत्ता व जन्म दिनांक, परिक्षा केंद्र इत्यादी माहिती एडीट करून बनावट हॉल तिकीट बनवून विद्यर्थिनींची फसवणूक केल्याच प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर कॅफे चालकावर आज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना विद्यार्थिनी

हेही वाचा - Yavatmal Cholera explosion : यवतमाळ जिल्ह्यात डायरिया कॉलराचा उद्रेक, 20 रुग्ण आढळले, 1 महिलेचा मृत्यू

गिरीष गेडाम (वय.35 रा. वाघापूर, पिंपळगाव रोड यवतमाळ) असे फसवणूक करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर, नंदिनी संदीप मोकळकर (रा. अनुश्री पार्क, पिंपळगाव रोड, यवतमाळ) असे फसवणूक झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ही विद्यार्थिनी पिंपळगाव बायपासवरील गिरीष गेडाम याच्या कानन सायबर कॅफेमध्ये 9 जुलै रोजी गेली होती. यावेळी गिरीष गेडाम नामक ऑपरेटरला नीट परीक्षेचा फॉर्म भरण्याबाबत विचारणा केली. त्याने होकार देत आवश्यक कागदपत्रे आणण्यास सांगितले.

विद्यार्थिनीने कागदपत्रे दिली व ऑपरेटरने फॉर्म भरण्यास सुरुवात केली. दरम्यान ऑपरेटरने लिंक नसल्याचे सांगत फॉर्मची प्रिंट नंतर देतो, असे म्हणत 1 हजार 700 रुपये घेतले. विद्यार्थिनीने प्रिंटसाठी फोन केला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच खोटे बोलत होता. त्यामुळे विद्यार्थिनीचे आईवडील घरी गेले. त्यावेळी ऑपरेटरने मोबाइलवर पीडीएफ पाठविले. मात्र त्याची पाहणी केली असता ते चुकीचे दिसले. पुन्हा चौकशी करण्यासाठी कॅफेत गेले असता नेटवर्क प्राबलेम असल्याचे सांगितले. त्यानंतर निट परिक्षेची दुय्यम प्रत (ओ.सी. प्रिंटआउट) वॉट्सअॅपवर पाठविली. नंदिनीला खात्री पटल्यामूळे परिक्षेचा अभ्यास करत होती.

12 जुलै रोजी निट परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध झाले. त्यामुळे नंदीनीने हॉल तिकीटची मागणी केली असता कॅफे चालक गिरीष याने हॉल तिकीट देण्यास टाळाटाळ केला. त्यानंतर 13 जुलै 2022 रोजी गिरीशने हॉल तिकीटची प्रिंट मोबाईलवर वॉट्सअॅप वर पाठवली. त्यानंतर 17 जुलै रोली पोद्दार शाळेमध्ये परीक्षा देण्यासाठी गेलेल्या नंदीनीच्या आसनावर दुसराच विद्यार्थी परीक्षा देत होता. परीक्षा केद्रावर देखील नंदिनीचा कुठलाच अर्ज भरल्याचे दिसून आले नाही.

असाच प्रकार ऋषाली संतोष गिरी (वय. 18 रा. सुरभी नगर, पिंपळगाव) या विद्यार्थिनीसोबत देखिल घडला. त्यामुळे सदर सायबर कॅफे चालकाने नीट परीक्षेचा फॉर्म न भरता निटच्या बेवसाईटवरून दुसऱ्या कोणाचे तरी हॉल तिकीट डाऊनलोड करून त्या हॉल तिकीटमध्ये नाव, पत्ता व जन्म दिनांक, परीक्षा केंद्र इत्यादी माहिती संपादन करून बनावट हॉल तिकीट तयार करून फसवणूक केल्याचे दिसून आले. घटनेनंतर नंदिनी व ऋषाली यांनी यवतमाळ शहर पोलिसात तक्रार दिली असून आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - भाजपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अॅलर्जी, बॅनरवरील फोटोत खाडाखोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.