ETV Bharat / state

कौतुकास्पद.! नवरीची घोड्यावरून वरात; मुलगा-मुलगी एकसमान असल्याचा दिला संदेश - marriage

गाडगे परिवारातील नेहाचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी आनंदात पार पडला. यावेळी गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली. याप्रसंगी लोकांना ‘मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला.

घोड्यावर जाताना नवरी
author img

By

Published : Jul 17, 2019, 1:35 PM IST

Updated : Jul 17, 2019, 3:14 PM IST

यवतमाळ - 'मुलगा-मुलगी एकसमान' हे केवळ बोलूनच नाही तर कृतीत आणल्याचा प्रत्यय दिग्रस येथे नुकताच आला आहे. येथील गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली आहे. त्यांच्या या कृतीतून त्यांनी समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

वरातीत घोड्यावरून जातानाचे नवरीचे दृष्य

गाडगे परिवारातील नेहाचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी आनंदात पार पडला. यावेळी गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली. याप्रसंगी लोकांना ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला. त्याचबरोबर गाडगे परिवाराने आपल्या मुलीची वरात घोड्यावर काढून 'मुलगामुलगी एकसमान' असल्याचे कृतीतून साकारत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. यावेळी मुलीने वरातीमध्ये आजीआजोबा व इतर नातेवाईकांबरोबर नाचून नवरदेवाप्रमाणेच वरातीचा आनंद लुटला. मुलींनीही अशाप्रकारचा आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे, असा संदेशच जणू नेहाने तिच्या लग्नात दिला.

Intro:नवरीची घोड्यावरून वरात Body:यवतमाळ : नवरदेवाप्रमाणे नवरीलाही वरातीत घोड्यावर बसण्याची इच्छा असते. परंतु बहुतांश मुली अशाप्रकारची इच्छा बोलूनच दाखवित नाही. परंतु, आता जग बदलतेय, कुटुंबाच्या पाठिंबा मिळाल्यास मुलीही अशाप्रकारचा आनंद मिळवू शकतात.
मुलगा-मुलगी एकसमान याचा प्रत्यय दिग्रस येथे नुकताच आला. येथील गाडगे परिवारातील मुलगी नेहा रवींद्र गाडगे हिचा शुभविवाह वर्धा येथील कुणाल शिवपाल कडू यांच्याशी आनंद व हर्षोल्हासात नुकताच झाला. गाडगे परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाची वरात घोड्यावर काढली. यातून ‘मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीचा प्रत्यय आला. मुलीची घोड्यावर वरात काढून मुलगामुलगी एकसमान बोलूनच नाही तर कृतीतून साकारत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला. स्त्री जन्माचे स्वागत करण्याचा संदेशही दिला. त्याच बरोबर मुलीने वरातीमध्ये आजीआजोबा व इतर नातेवाइकांबरोबर नाचून नवरदेवाप्रमाणेच नवरीनेही वरातीचा आनंद लुटला. मुलींनाही अशाप्रकारचा आनंद घेण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे, असा संदेशच जणू नेहाने दिला.Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.