यवतमाळ - जिल्ह्यात शनिवारी 43 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे, तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्यूची एकूण संख्या 79 झाली आहे. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या चार जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात शनिवारी नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 43 जणांमध्ये 27 पुरुष व 16 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 13 महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, आर्णि तालुक्यातील एक पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व एक महिला आणि पांढरकवडा शहरातील एक पुरुष पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच ४ मृतामंध्ये आर्णी तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 55 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 713 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर होम आयसोलेशनमध्ये तर 150 जण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3165 झाली आहे. यापैकी 2223 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 79 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 156 जण भरती आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शनिवारी 60 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 47392 नमुने पाठविले असून यापैकी 45606 प्राप्त तर 1786 अप्राप्त आहेत.