यवतमाळ - आर्णी रोडवरील जगदंबा कॉलेजजवळ सोमवारी मध्यरात्री दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. भरधाव वेगात असलेली दुचाकी दुभाजकाला धडकल्याने ही दूर्घटना घडली.
हेही वाचा - ज्यांच्याशी 'सामना' केला त्यांनीच माझ्या नेतृत्वावर ठेवला विश्वास - उद्धव ठाकरे
योगेश नेवारे, भरत चौधरी, महेश डोनोडे यांनी या दूर्घटनेत जीव गमावला. यातील दोघे वडगाव तर अन्य हिवरी येथील रहिवासी आहे. दूर्घटनेच्यावेळी योगेश दुचाकी चालवत होता. भरत चौधरीला हिवरी येथे सोडून देण्यासाठी तिघेही जात असताना ही घटना घडली. डोक्याला जबर मार लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा - अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली बैठक; चर्चा गुलदस्त्यात
घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडीसह ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणी मृतक योगेश नेवारे यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.