वाशिम - जिल्ह्यात सोमवारी (दि. 8 जून) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 19 अहवालांपैकी 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 17 जणांचे अवहाल निगेटीव्ह आलेत जिल्ह्यात आत्तापर्यंत प्राप्त अहवालानुसार 13 कोरोना बाधीत रुग्णाची नोंद अहे. बाधीत रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून सहा जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सोमवारी आढळलेल्या पॉझिटिव्ह दोन रुग्णांपैकी एक व्यक्ती बोराळा हिस्से (ता. वाशिम) येथील असून तो कोरोना बाधिताच्या संपर्कात आला होता. दुसरा 8 वर्षीचा मुलगा असून तो पोहरादेवी (ता. मानोरा) येथील आहे. त्यांने मुंबईतून वाशिम पर्यंत प्रवास केल्याचे समोर आले आहे. या मुलाच्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आईच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
मुंबईहून पोहरादेवी येथे आल्यानंतर या कुटुंबाला संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्यात आले होते. पोहरादेवी येथे येण्यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संंपर्कात हे कुटुंबिय आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
हेही वाचा - ट्रॅक्टरने पेरणी कशी करावी, वाशिम तालुक्यातील 62 हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण...