वाशिम - जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद या महामार्गावर ट्रक उलटल्याची घटना घडली. यामध्ये चालक व क्लीनर गंभीर जखमी झाले आहेत. हा ट्रक रायपूरवरुन मेहकर येथे लोखंडी अँगल घेऊन जात होता.
ट्रकमध्ये फसलेल्या दोघांना अर्ध्या तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.