ETV Bharat / state

वाशिममध्ये चोरट्यांचा धुडगुस; पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवरील 3 दुकाने फोडली - खळबळ

दुकान फोडून चोरट्यांनी अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वाशिम शहरात चोरट्यांचा धुडगुस
author img

By

Published : Jul 19, 2019, 3:12 PM IST

वाशिम - शहरात पोलीस ठाण्यापासून केवळ 200 मीटर अंतरावर 3 दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील कंकाळ कॉम्प्लेस्कमधील मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरी केली आहे.

वाशिम शहरात चोरी

अक्षदा किडस रेडीमेड कपड्याचे दुकान आणि रौनक फर्निचर या 2 दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले. तर, बाजुच्या पतंजली शॉपीचे दुकान फोडून चोरट्यांनी अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यासोबतच रिसोड रोडवरील सुपर शॉपीचेही दुकान चोरांनी फोडल्याची घटना घडली आहे.

चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र, शहरातील या धाडसी चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Intro:वाशीम शहरात चोरट्यांचा धुडगुस...
शहर पोलीसांना चोरांचे जबर आव्हान....शहरात खळबळ, व्यापारी भयभित......

अँकर:- जिल्हयाचे मुख्यालय असलेल्या वाशीम शहरात शहर पोलीस स्टेशनपासून केवळ दोनशे मीटर अंतरावर असलेल्या असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकानजीकच्या कंकाळ कॉम्प्लेक्समधील ओळीने तीन दुकाने मध्यरात्री च्या सुमारास चोरट्यांनी फोडून शहर पोलीसांना जबर आव्हान दिले. यापैकी अक्षदा किडस हे रेडीमेड कपड्याचे, रौनक फर्निचर या दोन दुकानाचे शटर उघडण्यात चोरटे अयशस्वी ठरले तर बाजुच्या पतंजली शॉपीचे दुकान फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील अंदाजे 15 ते 20 हजार रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती आहे. यासोबतच रिसोड रोडवरील सुपर शॉपीचेही दुकान चोरांनी फोडल्याची घटना घडली आहे. दरम्यान चोरी करताना सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस फुटेज च्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत. मात्र शहरातील या धाडसी चोर्‍यांमुळे नागरीकांत खळबळ उडाली असून व्यापारीवर्ग भयभित झाला आहे. या धाडसी चोर्‍यांमधून चोरट्यांनी एक प्रकारे पोलीसांना जबर आव्हान दिल्याचे दिसून येत आहे.Body:Feed : सोबत आहेConclusion:Feed : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.