ETV Bharat / state

दोन मुलांना फाशी देऊन आईनेही संपवले जीवन; सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू - washim

वाशिम जिल्ह्यात आईने तिच्या दोन मुलांना फाशी देऊन स्वत: फाशी घेतल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. त्या घटनेचा पोलीस तपास करत आहे. आत्महत्येचे नेमके कारण अजून समोर आले नसले तरी पोलिसांच्या हाती सुसाईड नोट लागली आहे.

मृत आईसह दोन मुले
author img

By

Published : Jul 20, 2019, 4:56 PM IST

Updated : Jul 20, 2019, 7:54 PM IST

वाशिम - आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह स्वतः आत्महत्या केल्याची घटना जिल्ह्यातील तोंडगाव इथे घडली. या घटनेमुळे प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे. जयश्री गजानन गवारे (वय 28), गणेश गजानन गवारे (वय 05) आणि मोहित गजानन गवारे (वय 03) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. मात्र, तपासात पोलिसांच्या हाती सुसाईड नोट आली असल्याने त्याआधारे वाशिम ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

'त्या' प्रकरणी सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू

वाशिम तालुक्यातील तोंडगाव हे जयश्री यांचे माहेर आहे. जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी या गावातील गजानन गवारे यांच्यासोबत झाला होता. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांना दोन अपत्ये झाली. त्यानंतर पती-पत्नीमधील वाद पोलिसांच्या उंबऱ्यावर पोहोचला होता. त्यामुळे जयश्री मागील काही महिन्यांपासून मुलांसह माहेरी तोंडगाव येथे वास्तव्यास होती.

सकाळी चिमुकल्यांना शाळेत पाठविण्याची तयारी सुरू असताना जयश्री यांनी दोन्ही चिमुकल्यांना फाशी दिली. त्यानंतर स्वत:ही घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविले होते. मात्र, आता जयश्रीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. तसेच तिच्या भावाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी तपास केल्यानंतरच आत्महत्येमागचे नेमके कारण समोर येणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलांची हत्या केल्याप्रकरणी तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर तिच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Intro:त्या प्रकरणी सुसाईड नोटच्या आधारे तपास सुरू

वाशिम : आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह स्वतः आत्महत्या केल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव इथे घडली. या घटनेमुळे प्रत्येकाचं मन सुन्न झालंय. जयश्री गजानन गवारे (28), गणेश गजानन गवारे (05) आणि मोहित गजानन गवारे (03) अशी मृतकांची नावे आहेत. आत्महत्येमागचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही.मात्र तपासात पोलिसांच्या हाती सुसाईड नोट आलीय त्या आधारे वाशिम ग्रामीण पोलीस तपास करत आहेत..

वाशिम तालुक्यातील तोंडगाव हे माहेर असलेल्या जयश्री यांचा विवाह तालुक्यातील जांभरुण नावजी येथील गजानन गवारे यांच्यासोबत झाला होता. काही वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांना दोन अपत्य झाली. त्यानंतर पती-पत्नीमधील वाद पोलिसांच्या उंबऱ्यावर पोहोचला होता. त्यामुळे जयश्री मागील काही महिन्यांपासून मुलांसह माहेरी तोंडगाव येथे वास्तव्यास होती.

सकाळी चिमुकल्यांना शाळेत पाठविण्याची तयारी सुरु असताना जयश्री यांनी दोन्ही चिमुकल्यांना फाशी दिल्यानंतर स्वत:ही घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलविले होते.व आता पोलिसांच्या हाती त्या महिलेने लिहलेली सुसाईड नोट लागलीय व त्याचे भावानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय

मात्र पोलिसांनी तपास केल्यानंतरच आत्महत्या मागचे नेमकं कारण काय समोर येणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या महिले विरुद्ध हत्येचा गुन्हा तर तिच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत. दोन निरागस मुलांसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

121 : तपास अधिकारी योगिता भारद्वाजBody:फीड : सोबत आहे Conclusion:फीड : सोबत आहे
Last Updated : Jul 20, 2019, 7:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.