वाशिम- राज्यानंतर वाशिम जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा पॅटर्न (Mahavikas Aghadi Pattern in Washim ZP election) दिसून आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे यांची बिनविरोध (Washim ZP election results) निवड झाली आहे.
ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे रिक्त झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे चंद्रकांत ठाकरे (chandrakant thakare) यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. त्यांच्यविरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने चंद्रकांत ठाकरे अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवडून (chandrakant thakare unopposed elected as Washim ZP CEO) आले आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्व पक्षीय घडी बसविण्यात चंद्रकांत ठाकरे यशस्वी ठरले. जिल्ह्याच्या राजकारणातील दादा म्हणून प्रसिध्द असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे हे पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष होणार याचे भाकीत अनेक राजकीय जाणकारानी केले होते. हे भाकीत तंतोतंत खरे ठरले.
हेही वाचा-Farm Laws Repeal : शेतकरी आंदोलकांचा केंद्र सरकारला झुकवण्यापर्यंतचा प्रवास...
असे होते जिल्हा परिषदेत राजकीय बलाबल-
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढल्याने काँग्रेस, शिवसेना, महाविकास आघाडीत वंचित व जनविकासचीही घडी बसली. त्यामुळे भाजपनेही माघार घेतली. वाशीम जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५२ आहे. पोट निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस १४, काँग्रेस ११, जनविकास ६, वंचित बहुजन आघाडीचे ६,शिवसेना ६,स्वाभिमानी शेतकरी संघटना १ तर अपक्ष १ असे पक्षीय बलाबल झाले आहे. मात्र, जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी एकमेव चंद्रकांत ठाकरे यांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
स्थानिक नेत्यांकडून महाविकास आघाडी पॅटर्नप्रमाणेच भूमिका
वाशीम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, काँग्रेसचे ११,शिवसेनेचे ६ सदस्य असे ३१ सदस्य एकत्र आल्यास महाविकास आघाडीचे सत्तेचे समीकरण जुळणे सोपे होते. त्यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी महाविकास आघाडीचीच भूमिका घेतल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला होता.
हेही वाचा-Farm Laws Repealed : 'अन्नदात्यानं सत्याग्रह करून अहंकाराचं डोकं खाली झुकवलं'; राहुल गांधींचे टि्वट
सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीनंतर चार विषय समितीच्या सभापती पदांपैकी रिक्त झालेल्या सभापती पदासाच्या निवडणूक कार्यक्रमाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. सभापती पदासाठी मोर्चेबांधणी सुरू असून महत्त्वाच्या पदासाठी चढाओढ लागली आहे. त्यावेळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भारिप-बमसंची युती झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली होती. हाच फॉर्म्युला विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीतही कायम राहिल, असे संकेत आहेत.