वाशीम - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गीताचे विडंबन केल्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेचा जाहीर निषेध करत अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी आठवले यांच्यावर निशाणा साधला.
वाशिम येथे आयोजीत पत्रकार परिषदेत कांबळे बोलत होते. या वक्तव्याप्रकरणी रामदास आठवले यांनी समाजाची व देशवासीयांची माफी मागावी अशी मागणीही यावेळी कांबळे यांनी केली. ही एका केंद्रीय राज्यमंत्र्याला न शोभणारी भाषा असल्याचे कांबळे म्हणाले. एखाद्या सामान्य माणसाने चूक केले तर समजू शकतो, पण ज्यांच्याकडे सामाजिक न्याय विभागाचा कारभार आहे त्यांनीच असे वक्तव्य करणे म्हणजे निषेधार्ह असल्याचे कांबळे म्हणाले.