वाशिम - पश्चिम विदर्भात उन्हाचा पारा रोजच वाढत असून, वाशिम जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअसच्या पुढे ( Heat wave in Vidarbha ) गेलाय. मानवासोबतच जनावरांच्याही अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे दुधाळ जनावराचा दूध कमी होण्याचा धोका वाढला आहे. आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील भट उमरा येथील प्रवीण काळे या युवा शेतकऱ्याने भन्नाट उपाय ( Showers for buffaloes in washim ) शोधलाय. त्यांनी म्हशींसाठी गोठ्यात चक्क शॉवरच लावले आहेत. त्यामुळे दुधाळ जनावरांना याचा चांगला फायदा होत आहे.
दुधात झाली वाढ - वाशिम तालुक्यातील भट उमरा हे 1500 लोकसंख्येचे गाव असून, शहरजवळ असल्याने येथील शेतकरी शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय करतात. याच गावातील तरुण शेतकरी प्रवीण काळे यांच्याकडे 13 म्हशी असून, प्रवीण काळे वाशिम शहरात घरोघरी जाऊन दररोज 75 लिटर दुध 50 रुपये दराने विक्री करतात. त्यापासून त्यांना महिन्याकाठी 40 ते 45 हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचं प्रवीण काळे सांगतात. पश्चिम विदर्भात यंदाच्या तापमामाने मागील अनेक वर्षांतील एप्रिल महिन्यात उच्चांक गाठला आहे. त्यामुळे विदर्भात अंगाची लाही-लाही होत आहे. मात्र प्रवीण काळे या शेतकऱ्यांनी आपल्या भन्नाट कल्पनेतून शावर लावून गोठ्याचं तापमान तर कमी केले आहे. शिवाय दूध उत्पादनही वाढले आहे. त्यासोबत जनावरांच आरोग्य सांभाळलं आहे. यांच्या प्रमाणे इतर शेतकऱ्यांनी असे प्रयोग केल्यास दूध उत्पादनात वाढ होईल यात मात्र शंका नाही.
हेही वाचा - Todays Petrol Diesel Price : जाणून घ्या आपल्या शहरातील आजचा पेट्रोल डिझेल दर