वाशिम - अयोध्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संपूर्ण देशाच्या हिताचाच असेल. तेव्हा या निकालाचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आदरपूर्वक सन्मान करावा. तसेच, जिल्ह्यात अतिरिक्त 600 होमगार्ड आणि स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सची एक टीम बोलविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक वसंत परदेशी यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, सोशल मीडियावरुन कोणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.