वाशिम - वर्धा येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कारंजा येथील डॉक्टरासह पाच व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वाशिमकरांना दिलासा मिळाला आहे. कवठळ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कारंजा येथील डॉक्टरसह पाच व्यक्ती आणि पाचंबा व पोहा येथील 'सारी'चे प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण ७ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने ११ मे रोजी तपासणीसाठी अकोला येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
१२ मे रोजी पाठविलेल्या ९ स्त्राव नमुन्यांचे तपासणी अहवाल अजून प्राप्त न झाल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयद्वारे देण्यात आली आहे.