वाशिम - जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे रामनवमी निमित्त भव्य यात्रेला सुरुवात झाली आहे. बंजारा समाज बांधव कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व राज्याच्या विविध जिल्ह्यांतून या उत्सवासाठी श्रीक्षेत्र पोहरादेवीत एकत्र येणार आहेत. संस्थानकडून या यात्रा महोत्सवाकरिता जय्यत तयारी करण्यात अली आहे.
हेही वाचा - Video : काटेपूर्णा अभयारण्याला वनोजाजवळ भीषण आग
कोरोना संसर्गामुळे गत दोन वर्षे मंदिर बंद होते. जिल्हाधिकारी यांनी या वर्षी रामजन्मोत्सवाला सार्वत्रिक परवानगी दिल्याने देशातील भाविक यावर्षी मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत. गुढीपाडव्यापासून देशभरातील भाविकांना जगद्गुरू संत सेवालाल महाराज, जगदंबादेवी व बंजारा धर्मगुरू श्रीसत डॉ. रामरावबापू महाराज यांच्या दर्शनाची ओढ लागली असते. यानिमित्त येणाऱ्या भाविकांना अन्नदान केले जाते. त्यात भाविक मोठ्याप्रमाणात लाभ घेत असतात.
पुरातन संस्कृतीचा वारसा लाभलेला हा समाज देशात कुठेही वास्तव्यास असला तरी सर्वांची मातृभाषा व रीतीरिवाज एकच असून, दरवर्षी जवळपास सर्वच समाजबांधव या यात्रेनिमित्त एकत्र जमत असल्याने पोहरादेवी येथे रामनवमीला मोठी गर्दी होत असते. कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यादाच मोठ्याप्रमात यात्रा भरणार आहे. गुजरात, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक या प्रांतातून लाखो भाविक येथे हजेरी लावतात. बोललेल्या नवसाचे बोकड बळी दिले जाते, मात्र जिल्हा प्रशासनाने यावर बंदी घालून दिली आहे.
हेही वाचा - Crop Protection Idea : पीक संरक्षणासाठी शेतकऱ्याचे जुगाड; पाहा, काय केलंय गड्यानं?