वाशिम - रेतीची वाहतूक करणारी 11 (टिप्पर) वाहने पकडण्यात आली आहे आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ही वाहने पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहेत. ही घटना आज (बुधवारी) रिसोड तालुक्यातील जहाँगीर परिसरात घडली.
वाहनचालकांची धांदल उडाली -
आसरा माता मंदिर परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेतीची अवैध वाहतूक प्रकरणी तपासणी मोहीम राबविली. महसुल विभागाचे पथकही तातडीने भर जहागिर नजीच्या घाटामध्ये आल्याने वाहनचालकांची एकच धांदल उडाली. काही वाहने भर जहागिर गावामध्ये तर काही वाहने मोरगव्हाण सिंचन तलाव परिसराकडे वळविण्यात आली. तर अनेक वाहनांनी परतीचा मार्ग स्विकारला. यावेळी भर जहागिर बस थांबा काही वेळेपर्यंत रेतीच्या वाहनांनी गजबजलेला होता.
एकाच पावतीवर दोन ते तीन वेळा रेती वाहतुक करणे ही नित्याचीच बाब झाल्याने ही मोहिम राबविण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महसुल विभागाच्या ताब्यात दिलेल्या वाहनांचे पंचनामे सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
हेही वाचा - जळगावात कोविड सेंटरमध्ये रुग्णाने आणल्या मद्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या