वाशिम - मानोरा तालुक्यातील धुनी पाळोदी येथील 10 जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली आहे. लखन पडवळ या शेतकऱ्याची ही जनावरे होती.
मानोरा तालुक्यातील धुनी पाळोदी येथील जनावरे वाशिम तालुक्यातील टो येथे चराईसाठी आणली होती. त्यावेळी जनावरांनी ज्वारीचे कोमटे खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.