वर्धा - एरवी खाकी वर्दी अंगात आणि हातात पोलीस काठी असणाऱ्या महिला पोलीस आज वेगळ्या रुपात दिसून आल्यात. गुन्हेगारीला आळा घालणाऱ्यांनी कोरोनाच्या काळात पोलीस कर्तव्य बजावलेच, पण पत्नीधर्म पार करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवत महिला कर्मचाऱ्यांनी हातात पूजेचे ताट घेऊन पतीच्या दिर्घायुष्यासाठी पोलीस ठाण्यातच वटपौर्णिमा साजरी केली. विशेष म्हणजे खाकी परिधान करुन या महिला पोलिसांनी पूजा अर्चा केली. हे चित्र वटपौर्णिमेच्या दिवसानिमित्त शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आले.
महिला म्हटले की घर संसार हे आहेच. पण पोलीस खात्यात काम करताना प्रथमस्थान कर्तव्याला द्यावे लागते. अगोदरच कोरोनाचा काळ यात वाढलेला कामाचा ताण असल्याने घराकडे दुर्लक्ष होत असल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळत आहे. तसा आजचा दिवस साज शृंगार करून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पूजा अर्जा करण्याची प्रथा. दरवर्षी अशाच पद्धतीने वटसावित्रीचा दिवस साजरा करत असतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शक्य झाले नाही.
यामुळे शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना महिलांनी पोलीस कर्तव्य बजावले. शिवाय पत्नीधर्म सुद्धा पार पाडले. कर्तव्य बजावताना घराकडे दुर्लक्ष होते. यात मात्र आजच्या दिवशी सुद्धा ड्युटीवर असल्याने तयारी न करता पूजा अर्चा करावी लागली. शहर ठाण्याचा आवारातच असलेल्या वडाच्या झाडाची पूजा तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून पत्नी धर्म पार पडल्याचे महिला कर्मचारी अधिकाऱ्यांनी सांगितले.