ETV Bharat / state

शेजाऱ्याने महिलेला चाकूने भोसकले; मारेकरी अटकेत - walmiki chandankhede

रिता प्रमोद ढगे असे या महिलेचे नाव असून सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

रिता ढगे
author img

By

Published : Feb 16, 2019, 8:35 AM IST

वर्धा - शेजाऱ्याने महिलेला चाकूने भोसकून निर्घृण केल्याने खळबळ उडाली. ही घटना हिंगणघाट येथील तुकडोजी नगरात घडली असून रिता प्रमोद ढगे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर वाल्मिक चंदनखेडे असे मारेकऱ्याचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी मारेकरी वाल्मीकला चंद्रपुरातून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

रिता आणि मारेकरी वाल्मिक हे दोघे तुकडोजी नगरात शेजारी राहतात. शुक्रवारी रिताच्या घरात कोणी नसताना वाल्मिक घरात आला. त्यानंतर काही वेळाने रिताच्या घरातून ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे शेजारी रिताच्या घराकडे धावत गेले. यावेळी वाल्मिक रिताच्या पोटात चाकूने वार करत होता. हा सगळा खुनाचा थरार पाहून शेजारी ओरडले, तेव्हा वाल्मिक चाकू घेऊन त्यांच्याही मागे धावला. त्यानंतर तो तेथून पसार झाला.

घटनास्थळावर असलेल्या अतुल वंदिले यांनी जखमी अवस्थेत रिताला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. चाकूच्या वारामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने बेशुद्ध रिताला सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रिताचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांकडून घटस्थळाची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी शेजारच्या लोकांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती सांगितली. त्यानंतर सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातून वाल्मिकीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवर यांनी दिली.

undefined

हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट

मृत रिताचे पती प्रमोद ढगे हे शिक्षक असून मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. येत्या महिन्यात मुलीचे लग्नही ठरलेले आहे. मात्र, अचानक झालेल्या या हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी वाल्मिकचा शोध सुरू केला असता सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवर यांनी दिली. तोपर्यंत मात्र हत्येचे कारण कळू शकले नाही. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे.

Intro:R_MH_15 _FEB_WARDHA_MAHILECHI_HATYA VIS_1 फाईल आणि मृतक महिलेच्या फोटो FTP ने पाठवला आहे.

हिंगणंघाटात भरदिवसा महिलेचा चाकूने भोसकून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात, अनेकांनी पहिला थरार

- भरदिवसा महिलेची घरात घुसून हत्या
- चाकूने पोटात भोसकताना अनेकांनी पहिला थरार
- आरोपीला चंद्रपूर जिल्ह्यातून अटक
- हत्येचे कारण अस्पष्ट
-मारेकरी त्याच वार्डातील राहवासी

वर्धा - भरदिवसा हिंगणघाट येते एका महिलेची घरात घुसून निर्घुण हत्या करण्यात आली. तुकडोजी वार्डात भरदिवसा रक्ताच्या घडलेला या थराराने शहरात चांगलीच खळबळ माजली. घरात कोणी नसताना महिलेच्या घरात घुसून मारेकरी हा चाकूने वार केला. आरडाओरण्याचा आवाज एकूण घराकडे गेले. यावेळी शेजाऱ्यांनी खिडकीतून हा थरार उघड्या डोळ्यांनी पाहिला. रिता प्रमोद ढगे असे या महिलेचे नाव असून सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हिंगणघाट पोलिससनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मृतक रिता प्रमोद ढगे तुकडोजी वार्ड येथील रहिवासी आहे. तर मारेकरी वाल्मिक चंदनखेडे वय 45 हा सुद्धा त्याच वार्डातील रहिवासी आहे. रिताच्या घरात कोणी नसतांना वाल्मिक हा घरात गेला. काही वेळाने जेव्हा रिताच्या घरातून ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा लगतचे शेजारी धावून गेले. यावेळीं वाल्मीक हा रिताच्या पोटात चाकूने वार करत होता. हा सगळा खुनाचा थरार पाहून शेजारी ओरडले तेव्हा वाल्मीकीने चाकू घेऊन त्यांचा मागे धावला. रक्तबंबाळ हातात चाकू घेऊन तेथून पसार झाला.

एवढ्यात अतुल वंदिले यानी जखमी अवस्थेत महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. चाकूच्या वार लागून अति रक्तस्त्राव झांल्याने तिला सेवाग्राम येथे नेण्यात आले. यावेळी उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

यावेळी हिंगणघाटचे एसडीपीओ भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवार यांनी घटस्थळाची पाहणी केली. शेजारच्या लोकांनी हकीकत पोलिसांना सांगितली. याच वेळी वाल्मिक याचा घरासमोर बसून असलेल्या महिलांनी तो रक्ताने माखलेल्या हाताने घरात आला होता. काही वेळातच हाताला पट्टी बांधून निघून गेल्याची महिती पोलिसांना दिली

मृत्यूचे कारण अस्पष्ट
मृतक रिताचे पती प्रमोद ढगे हे शिक्षक असून मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत आहे. येत्या महिन्यात मुलीचे लग्न सुद्धा ठरलेले आहे. पण अचानक घडलेल्या या घटनेने हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी वाल्मीकचा शोध सुरू केला असता सायंकाळी चंद्रपूर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित बंडीवर यांनी इनाडू इंडियाला दिली. तोपर्यंत मात्र हत्येचे कारण कळू शकले नाही. पोलीसाचा तपास सुरू आहे.

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.