वर्धा - खरांगणा वनपरिक्षेत्र विभागातील डोंगरावर वसलेले शंकराचे एक स्थान आहे. याठिकाणी गुहेत लिंग असून याला लहान ढगा असे म्हटले जाते. महाशिवरात्रीनिमित्त या देवस्थानाला भाविकांनी गर्दी केली होती. भक्तांच्या रांगांनी संपूर्ण डोंगराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. तसेच परिवहन मंडळाकडून देखील भक्तांच्या सोयीसाठी बससेवा पुरवण्यात आली.
महाशिवरात्री तसेच दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. दिवसभर प्रसाद आणि पाणी वाटपाची व्यवस्था देवस्थानाच्या वतीने करण्यात येते. महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी सुरू झालेली गर्दी दुसऱ्या दिवसापर्यंत असते. भाविकांच्या सोईसाठी याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.