ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या आवाहनाला वर्धेकरांची साथ; कोरोनाविरोधात एकजुटीने दिव्यांची रोषणाई - दिवे लावा

रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅश लाईट सुरू करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केले होते. त्यांच्या या आवाहनाला रविवारी रात्री ९ वाजता वर्धेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला.

wardha following the call of pm modi to switch of all the lights of houses a
पंतप्रधानांच्या आवाहनाला वर्धेकरांची साथ; कोरोनाविरोधात एकजुटीने दिव्यांची रोषणाई
author img

By

Published : Apr 6, 2020, 9:43 AM IST

वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना रविवारी घरातील विजेचे दिवे बंद करून दिवे, पणत्या, मेणबत्या लावण्याचे आवाहन केले होते. यावर सोशल मीडियावर चर्चा टीका टिपण्याही झाल्यात. वीज वितरणने देखील आपली अडचण समोर केली होती. तरीही या परिस्थितीत वर्धेकरांनीही घरापुढे दिव्यांची रोषणाई करत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

ड्रोन चालक अमित देशमुख यांनी ड्रोन क‌ॅमेरात टिपलेले वर्ध्याचे विहंगम दृश्य...

हेही वाचा... दिवे लावत औरंगाबादकरांनी दिले कोरोनाविरोधात एकजुटीचे दर्शन

कुठे दिवे लागले तर कुठे मोबाईलचे टॉर्च लागले. मात्र, लोक मरत असताना काहींनी फटाके फोडले यावर अनेकांनी टीका केली. नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात एकत्र येत दिव्यांची आरास करत पणत्या पेटवल्या. जे चित्र शहरात होते तेच चित्र ग्रामीण भागात सुद्धा पाहायला मिळाले. ग्रामीण भागातही या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसात दिला. खासदार रामदास तडस यांनीही घराच्या बाल्कनीत दिवे लावून या आवाहनाला साथ दिली.

wardha following the call of pm modi to switch of all the lights of houses at 9 pm for 9 minutes and just light a candle diya or mobiles flashlightछायाचित्रकार राहूल तेलरांधे यांनी टिपलेले क्षणचित्रे

हेही वाचा... पंतप्रधानांच्या आवाहनाला पुणेकरांची साथ; नागरिकांनी घरोघरी लावले दिवे

वर्धेकरांनी केलेली रोषणाई ड्रोन कॅमेरात टिपण्याचे काम सिंदी मेघे येथील ड्रोन चालक अमित देशमुख यांनी केले. तर वर्ध्यातील छायाचित्रकार राहूल तेलरांधे यांनी काही क्षणचित्रे आपल्या क‌ॅमेरात कैद केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.