वर्धा - रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेली वृक्ष तोड होऊ नये, यासाठी वर्ध्यात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले. दत्तपुर ते महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमकडे जाणाऱ्या मार्गावरील वृक्ष कापण्याऐवजी जतन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. वर्ध्यात पर्यावरणप्रेमी आणि गांधीवाद्यांनी झाडांपुढे फलक घेऊन उभे राहत वृक्ष कटाईला विरोध दर्शवला आहे.
सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत वर्धा ते सेवाग्राम मार्गाच चौपदरीकरण केले जात आहे. त्याकरीता साधारण 70 ते 80 वर्ष जुम जुनी डेरेदार झाड तोडली जाणार होती. यात पर्यावरण प्रेमी आणि गांधीवादी मंडळींनी विरोध केला. यात त्यांना काही प्रमाणात यशही लाभले आहे. यात पुनः सर्वेक्षण करून कमीत कमी झाडे तोडले जावे, यासाठी लक्ष वेधले जात आहे. पण, झाडे तोडली जाऊच नये यासाठी धडपड करत आहेत.
या गांधीगिरी आंदोलनातुन पर्यावरण प्रेमीत लहान मुले सुद्धा हातात फलक सहभागी झाले होते…
- प्रगती करू नका असे आम्ही म्हणत नाही, पण 80 वर्ष जुने वृक्ष फॅक्टरीमध्ये बनत नाही,
- कापू नको माझे मूळ, दुष्काळ राहील उभा पुढं,
- तापल्या जीवाला मायेची सावली, झाड असंख्य जीवांची मावली,
- हवे अहिंसेचे गाव नलो कुऱ्हाडीने घाव,
- झाडे मुकी रे मुक्याने जातील, पण भविष्यात तुझेच हाल होतील.
यासारखे फलक घेऊन वृक्ष तोड होऊ नये यासाठी वृक्षतोडीचे परिणाम या फलकातून मांडत आंदलकांनी लक्ष वेधण्यात आले.
हेही वाचा - भारतीय लिपींद्वारे राष्ट्रगीताला अनोखी मानवंदना
आमचा विकासाला नाही तर विनाशाला विरोध...
हा रस्ता चौपदरी झाल्यास स्वाभाविकच वाहनांचा वेग वाढेल आणि अपघातांचे प्रमाणही वाढेल. जीव धोक्यात घालणारा चौपदरी रस्ता आम्हाला नको. रस्ता लहान झाला तरी चालेल पण वृक्ष वाचले पाहिजे. विकासकामांना आमचा विरोध नाही. पण हा विकास पर्यावरणाला हानी पोहचवणारा नसावा, तर जिल्ह्याच्या शांतिप्रियतेचा आणि साधेपणाचा गौरव वाढवणारा असावा, अशी भावना आंदोलकांनी केली आहे.
शांतीपथ निर्माण व्हावा, यासाठी या आंदोलनात सुषमा शर्मा, मुरलीधर बेलखोडे, अतुल काळे, करुणा फुटाणे, विभा गुप्ता, संजय इंगळे तिगावकर, डाॅ. आलोक बंग, डाॅ. सचिन पावडे, युवराज गटकळ, डाॅ. अभ्युदय मेघे, डाॅ. आरती गगने, सु.वि., डाॅ. विठ्ठल साळवे, अद्वैत देशपांडे, शूचि सिन्हा, डाॅ. अनुपमा गुप्ता, अक्षद सोमनाथे, मनोज ठाकरे, डाॅ. मृत्युंजय, शिशीर देशमुख, कपिलवृक्ष गोडघाटे, राहुल तेलरांधे, मोहित सहारे, दर्शन दुधाने, गुरुराज राऊत, मयूर नागोसे, पराग दांडगे आदी मंडळी या वृक्ष संरक्षण समितीत सहभागी झाली आहे.