ETV Bharat / state

वर्ध्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे सर्व्हे व्हायरल; राजकीय गोटात खळबळ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे सर्व्हे व्हायरल

निवडणुंकामुळे सध्या राज्यातील राजकीय  वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे एक सर्व्हे व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर विधानसभेसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांना असलेल्या जातीनिहाय पसंतीचा सर्व्हे आहे.

प्रसाद देशमुख, नगर संघचालक
author img

By

Published : Sep 24, 2019, 10:12 PM IST

Updated : Sep 24, 2019, 10:46 PM IST

वर्धा - सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे एक सर्व्हे व्हायरल झाला आहे. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटर हेडचा वापर करण्यात आला आहे. या लेटरहेडवर विधानसभेसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांना असलेल्या जातीनिहाय पसंतीचा सर्व्हे आहे. संघाच्यावतीने याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावे एक सर्व्हे व्हायरल झाला

या प्रकाराने भाजपमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सदर प्रकरण हे विद्यमान आमदार पंकज भोयर यांच्याविरोधात केलेला खोडकरपणा असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.

व्हायरल झालेल्या या सर्व्हेमध्ये आमदार पंकज भोयर यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवली गेली आहे. पहिल्या क्रमांकावर माजी खासदार सुरेश वाघमारे आहेत. हा खोडकरपणा असून असा सर्व्हे संघ करत नसल्याचे वाघमारे म्हणाले. भाजपच्या मीडिया सेलच्यावतीनेही पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लेटरहेड
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लेटरहेड

हेही वाचा - जागावाटपाचा तिढा भारत-पाकिस्तानच्या 'फाळणी'पेक्षाही कठीण - संजय राऊत

लेटरहेडवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली कार्यालयाचा पत्ता असून २० सप्टेंबर २०१९ अशी तारीख लिहलेली आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघ जाती आणि उमेदवार असा तक्ताही आहे. वेगवेगळ्या चार क्रमांकांवरून हे सर्व्हेक्षण व्हॅाट्सअ‍ॅपला व्हायरल केल्यानंतर हे क्रमांक बंद करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अशा प्रकारचे सर्व्हेक्षण केले जात नाही. संघाची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोडकर वृत्तीतून हा प्रकार घडवून आणला गेला आहे, अशी माहिती नगर संघचालक प्रसाद देशमुख यांनी दिली.

Intro:वर्धा आरएसएस स्टोरी

1)बाईट- प्रसाद देशमुख, नगर संघचालक
2)बाईट - प्रशांत बुरले, शहर अध्यक्ष,भाजपा

mh_war_rss_story_pkg_7204321

वर्ध्यात आरएसएसच्या नावे आंतरिक सर्व्हे व्हायरल, पोलिसात तक्रार

- भाजपच्या इच्छुक उमेदवारांना जातीनिहाय पसंतीचा उल्लेख
- विद्यमान आमदाराला डावलत दाखवला तिसरा क्रमांकावर

- संघाच्या लेटरहेडवर प्रकाशित सर्व्हे सोशल मिडीयावर ’व्हायरल’

- वर्ध्यातील राजकीय वातावरण तापले

वर्धा - सोशल मीडियावर केव्हा काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. पण जेव्हा राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचा लेटर हेडचा वापर होत असेल तर विषय गंभीर आहेच. शिवाय संघाचा प्रतिमेला धक्का पोहचवणारा सुद्धा. या लेटरहेडवर विधानसभेचे भाजपचे इच्छुक उमेदवारांना जातीनिहाय असलेल्या पसंतीचा सर्व्हे होता. यामुळेच संघाच्या वतीने याची दखल घेत पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकराने मात्र भाजपमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे.

सध्या निवडणूकीचे वारे वाहू लागल्याने आणि उमेदवार घोषित न झाल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यमान आमदार पंकज भोयर यांचा मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा आलेख पाहता त्याचा विरोधात केलेला खोडसर पणा असल्याचे भाजपडून बोलले जात आहे. विशेष म्हणजे यात आमदार पंकज भोयर यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती दाखवली गेली असून पहिला क्रमांकची पसंती माजी खासदार सुरेश वाघमारे यांना दाखवली आहे. ते स्वतः संघाशी जुडून आहे. त्यामुळे हा खोडसाळ पणा असून असा सर्व्हे संघ करत नसल्याचेही वाघमारे म्हणाले. भाजपच्या मीडिया सेलच्या वतीनेही पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.

या लेटरहेडवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नमूद करून दिल्लीच्या कार्यालयाचा पत्ता यावर आहे. आंतरीक सर्वे असे २० सप्टेंबर २०१९ अशी तारीख लिहिली आहे. त्यावर वर्धा विधानसभा मतदारसंघ जाती आणि उमेदवार असा तक्ता आहे. वेगवेगळ्या चार क्रमांकांवरून हे सर्व्हेक्षण व्हाटसअ‍ॅपला व्हायरल केल्यानंतर हे क्रमांक स्वीच्ड ऑफ करण्यात आले. तोपर्यंत या संदेश व्हायरल होताच राजकीय गोटात चांगलीच खळबळ निर्माण झाली.

या लेटरहेडवर विद्यमान आमदार पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. सचिन पावडे या संभाव्य उमेदवाराच्या नावाचा सर्व्हे देण्यात आला. त्यापुढं आठ जाती धर्मांची नाव लिहित प्रत्येक जाती, धर्मातून या उमेदवारांना पसंतीची टक्केवारी लिहिण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकार्‍यांनीही पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यलयात जाऊन एक तक्रार दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अशा प्रकारचे सर्वेक्षण केलं जात नाही. यापूर्वी झाले नाही, यापुढे होईल असे वाटत नाही. त्यामुळे हा खोडकर वृत्तीतून हा प्रकार घडवून आणला असून संघाच्या प्रतिमेला धक्का लागण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनीही तक्रार दिल्याची माहिती नगर संघचालक प्रसाद देशमुख यांनी दिली.

आद्यप विधानसभेच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र विद्यमान आमदार यांच्या नावाला विरोध करत भाजपधूनच अंतर्गत कलहातून हा खोडसाळपणा केला असल्याचे बोलाले जात आहे. संदेश आलेल्या दूरध्वनी क्रमांकाचा पोलीस शोध घेत असून या मागे असलेला चेहरा लवकरच पुढे येईल अशी शक्यता भाजपकडून वर्तविली जात आहे. तो पर्यंत मात्र अंतर्गत कलहातून राजकीय वातावरण असेच तापलेले राहणार यात शंका नाही.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
Last Updated : Sep 24, 2019, 10:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.